हल्ली लोकांना मुर्ख बनवून त्याचे व्हिडिओ सोशल मीडिवर टाकण्याची क्रेझ आहे. परदेशात अशा प्रकारचे प्रँक व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेंडच आला होता. आता हाच ट्रेंड आपल्याकडे देखील आला आहे. युट्युबवर अशा प्रकारे प्रँक व्हिडिओ टाकणारे अनेक आहे. पण हा प्रँक व्हिडिओ बनवणे एकाच्या अंगाशी आला आहे.
‘फंक यु’ हा युट्युब व्हिडिओ चॅनेल अशा प्रकारचे  व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखला जातो. तरुणामध्ये त्यांचे व्हिडिओ चांगले प्रसिद्ध आहेत. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये काही कॉलेजची मुले खोटा साप दाखवून कॉलेजमधल्या मुला मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. आपल्या कामात मग्न असलेलल्या मुलांच्या अंगावर खोटा साप सोडायचा आणि ‘साप साप’ कडून ओरडायचे. मग बिचारा किंवा बिचारी धुम ठोकून पळत सुटला की मग हा प्रँक होता बाजूला व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे असे सांगून ओरडायचे. हे त्यांनी अनेकांच्या बाबतीत केले. पण काहिंनी विनोदाचा भाग म्हणून त्यांना माफही केले. पण एका मुलीने मात्र अशी मस्करी करणा-याच्या श्रीमुखात भडकवून त्याला चांगली अद्दल घडवली. ही मुलगी पाय-यांवर पुस्तक वाचत बसली होती. तेव्हा एका मुलाने येऊन तिच्यावर खोटा साप टाकला आणि नेहमीचाच आरडा ओरडा सुरू केला. त्यामुळे घाबरून त्या मुलीने हातातले पुस्तक टाकून पळण्याचा प्रयत्न केला. पण याच तिचा तोल जाऊन ती पाय-यांवरून खाली पडली. नंतर या मुलाने  हा प्रँक व्हिडिओ असल्याचे तिला सांगितले त्यामुळे रागवलेल्या या मुलीने त्याच्या श्रीमुखात भडकवली. ‘फंक यु’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Story img Loader