ऑलिम्पिकमध्ये भाग घेणा-या प्रत्येक खेळाडूसाठी सूवर्ण पदक जिंकणे हे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात यावे यासाठी तो कित्येक वर्षे अथक प्रयत्न करतो. पदक जिंकल्यावर त्याला जितका आनंद होतो त्यापेक्षाही कैकपटीने आनंद हा तो ज्या देशाचे प्रतिनिधीत्त्व करत असतो त्या देशाला होतो, त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये कमावलेल्या पदकाशिवाय दुसरी कोणतीच मोलाची गोष्ट त्या खेळाडूसाठी नसते. पण हेच पदक जेव्हा चोरीला जाते तेव्हा त्या खेळाडूला होणा-या त्रासाची कल्पना कोणीच करू शकत नाही. असाच प्रकार अमेरिकेच्या ज्यो जेकॉबी याच्या बाबतीत घडला. १९९२ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांने सूवर्ण पदक पटकावले होते. पण त्याचे हे पदक चोरीला गेले.
आणि काही महिन्यांनंतर हे पदक एका लहान मुलीला चक्क केराच्या टोपलीत सापडले. स्मित असे या मुलीचे नाव असून ती केवळ सात वर्षांची आहे. आपल्या वडिलांसोबत बाहेर जात असताना केराच्या टोपलीत तिला हे पदक दिसले. तिने हे पदक लगेचच ज्योला परत केले. पदक परत मिळण्याची अपेक्षाही नसलेल्या ज्योला ते देऊ करून स्मितने सुखद धक्का दिला. यासाठी ज्योने तिचे खूप आभार देखील मानले. इतकेच नाही तर स्मितचा आदर्श प्रत्येक लहान मुलांने घ्यावा असेही ज्यो म्हणाला. एखाद्याची वस्तू परत करण्याची चांगली सवय स्मितकडे आहे त्यामुळे प्रत्येकांनी ती आत्मसात करावी असा सल्ला देखील ज्योने तिच्या सोबत शिकणा-या लहान मुलांना दिला.

Story img Loader