Bihar Motihari Railway track Viral Video: बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील चकीया रेल्वे स्थानकाजवळ एक अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. मंगळावारी एक विद्यार्थीनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकवर पोहोचली होती. मात्र रेल्वे येण्यास उशीर झाल्यामुळे ती ट्रॅकवरच झोपी गेली. झोपलेल्या मुलीला लांबूनच पाहिल्यामुळे लोको पायलटने ट्रेनला ब्रेक मारला आणि बरोबर मुलगी झोपलेल्या ठिकाणी ट्रेन येऊन थांबली. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे सदर मुलीचा जीव वाचला असला तरी त्यानंतर या मुलीने बराच गोंधळ घातला. “मला जीव द्यायचा आहे…”, असा हट्ट करत तिने ट्रॅकवरून बाजूला होण्यास नकार दिला. अखेर स्थानिक महिलांना बोलवून तिला बाजूला केले गेले. यामुळे रेल्वेला पुन्हा अर्धा तास उशीर झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये काय दिसले?

सदर घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून यामध्ये हा संपूर्ण प्रकार दिसून येत आहे. १ मिनिट ४२ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये सदर मुलगी रुळावर पडलेली दिसत आहे. तिच्या डोक्याच्या अगदी जवळ ट्रेन येऊन थांबते. तिच्या खांद्यावर बॅग असल्यामुळे ती विद्यार्थीनी असावी, असा अंदाज बांधला जात आहे. यानंतर एक युवक येऊन मुलीला झोपेतून उठवतो आणि तिथे का झोपलीस? असा प्रश्न विचारतो. पण तरुणी रुळावरून उठण्यास तयार होत नाही. यानंतर काही स्थानिक महिला येऊन तिला पकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सदर तरुणी “मला मरायचे आहे, सोडा मला..”, असे ओरडताना दिसते.

हे वाचा >> खरंच नागपुर ते पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन १५ सप्टेंबरपासून सुरू होणार? आलिशान ट्रेनचा Video होतोय व्हायरल

हे ही वाचा >> लेकीच्या डोळ्यांसमोर आईच्या अंगावर पडली रिक्षा, शाळकरी मुलीने दाखवलं धाडस! थरारक अपघाताचा Video Viral

यानंतर महिलांनी तिला कसेबसे बाजूच्या रुळावर नेले आणि त्यानंतर ट्रेन मार्गस्थ झाली. या संपूर्ण नाट्यमय प्रसंगामुळे आधीच उशीर झालेल्या ट्रेनला आणखी अर्धा तास उशीर झाल्याचे कळते.