बेतिया (Bettiah, Bihar) येथील एका प्रेमिकेचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रेमिका काजल तिच्या लग्नाबद्दल सांगत आहे. काजल कुमारी (वय १९) म्हणत आहे की, “मी माझ्या शिक्षक प्रियकरासोबत पळून गेली (girl student ran away with her lover teacher)आहे. माझे आई-वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात होते. आमचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते. मी त्याच्या कोचिंग क्लासला जायचे. यादरम्यान मी त्याच्याशी बोलू लागले.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये मुलगी पुढे म्हणते की, ‘तीन महिन्यांपूर्वी मी कोचिंगचा अभ्यास करणे बंद केले. मी जेव्हा कधी त्याच्याशी घरी बोलायचे तेव्हा माझे घरचे लोक विरोध करायचे. मला मारायचे. म्हणूनच मी माझ्या प्रिय शिक्षक बंधू चौधरीला घेऊन पळून आले आहे. मी आता जगले तर बंधू चौधरींसोबत आणि मेले तर बंधू चौधरीसोबतच. माझे कुटुंबीय मला मारण्याचा प्रयत्न करत होते, मग मी काय करणार? त्यामुळे मी पळून त्यांच्याकडे गेले आणि त्यांना पळवून आणलं. माझ्या कुटुंबियांनी नवलपूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला आहे. आता मी जेव्हाही राहीन तेव्हा त्यांच्यासोबत असेन. आमचं लग्न झालंय. माझ्या कुटुंबीयांनी दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे.”

(हे ही वाचा: वडिलांनी लग्नासाठी पाठवलेल्या मुलाला मुलीने दिली ‘ही’ खास ऑफर; चॅटची होतेय सर्वत्र चर्चा)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काजल कुमारीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेटिया येथील नवलपूर ओपी पोलीस स्टेशन हद्दीतील नवलपूर गावातील घटना आहे. विद्यार्थिनी काजल कुमारी आणि शिक्षक बंधू चौधरी हे प्रेमप्रकरणातून घरातून फरार झाले आहेत. मुलीचे वडील रामनाथ साह यांनी नवलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावर मुलीने आपल्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल केला असून या संपूर्ण प्रकरणाला प्रेमप्रकरण असल्याचे सांगत शिक्षक बंधू चौधरी यांच्यासोबत जगेण-मरेण असं बोलत आहे.

(हे ही वाचा: अ‍ॅटिट्यूड दाखवत रस्त्यावरून चालत होती मुलगी आणि पुढे…; बघा हा viral video)

काय म्हणाले पोलीस?

या संपूर्ण प्रकरणावर नवलपूरचे एसएचओ अजय सिंह म्हणाले की, मला व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल माहिती नाही. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा शोध सुरू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl student ran away with her lover teacher the truth told by making video viral ttg