आजकाल लहान सहान गोष्टींवरून अनेकांचे वाद होत असतात. कधी कधी या वादाचं रुपांतर मारामारीत होतं आणि मग यात काहींना दुखापत होते. काही जण कधी कोणत्या गैरसमजामुळे, तर कधी मुद्दाम भांडणासाठी कारण शोधून काढतात. या भांडणात अनेक जण आपापल्या मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडणं मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुली मोठ्या प्रमाणात भांडण करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि व्हिडीओमध्ये विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, ही घटना ग्रेटर नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठात घडली.
मुलींमध्ये झाला राडा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्याता आला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, तीन मुलींमध्ये वाद सुरू होतो आणि त्यानंतर दोन मुली एकमेकांना मारहाण करू लागतात आणि अज्ञात वादावरून एकमेकींचे केस ओढताना दिसतात. त्या एकमेकींना कानाखालीसुद्धा मारू लागतात. तिसरी मुलगी हस्तक्षेप करते आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करते. तथापि, नंंतर ती देखील त्यात सामील होते आणि भांडणात सहभागी असलेल्या मुलीला मारू लागते.
या भांडणात आणखी काही मुली हस्तक्षेप करतात आणि जोरदार भांडण सुरू होते. व्हायरल व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, ही घटना गलगोटिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घडली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप केला आणि मुलींना वेगळे केले. शेवटी भांडण थांबले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या इतक्या भांडतात, घरून नेमकं काय खाऊन येतात”, तर दुसऱ्याने “नेटफ्लिक्सपेक्षा चांगलं तर हे बघण्यासारखं आहे आणि मोफतदेखील आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “सगळीकडेच भांडणं सुरू आहेत, कोणालाच शांती नाही आहे.”