Girl Students Fight Video: आजकाल लहान सहान गोष्टींवरून अनेकांचे वाद होत असतात. कधी कधी या वादाचं रुपांतर मारामारीत होतं आणि मग यात काहींना दुखापत होते. आपण सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे, पुरूषांचे तसेच महिलांचेदेखील वाद पाहिले असतील. पण सध्या तरुणी तसेच शाळेतल्या मुलीपण मारामारी करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात दोन विद्यार्थीनींचं सुरूवातीला कडाक्याचं भांडण होतं मग याचं मारामारीत रुपांतर होतं. नेमकं प्रकरण काय… ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थीनी तिच्या आईबरोबर स्कूटरवरून इच्छित ठिकाणी जाताना दिसतेय. स्कूटर चालू करण्यापूर्वीच अचानक तिथे ३ ४ विद्यार्थीनींचा घोळका येतो आणि त्या स्कूटरवर बसलेल्या विद्यार्थीनीशी त्या मुली भांडू लागतात. या भांडणात स्कूटरवर बसलेल्या विद्यार्थीनीची आई मध्ये पडते आणि बोलू लागते. थोड्या वेळाने तिची आई स्कूटर सुरू करते. स्कूटर सुरू करून थोड्या अंतरावर जाताच घोळक्यामधील एक विद्यार्थीनी मागे बसलेल्या मुलीला खेचते आणि तिला खाली पाडते. यामुळे आई गाडी तिथल्या तिथे थांबवते. या कारणामुळे दोन्ही विद्यार्थींनींचं भांडण अगदी टोकाला जातं आणि दोघी एकमेकींच्या अंगावर धावून जातात.

हेही वाचा… अशी वेळ कोणावर येऊ नये! पाणीपुरी विक्रेत्याचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

रस्त्यावर पडून एकमेकींचे केस ओढत दोघी एकमेकींना मारत असतात. त्यांचं भांडण थांबवायला त्या मुलीची आई मध्ये पडते. पण तरीही दोघींची मारामारी सुरूच असते. या वादामुळे तिथे गर्दी जमा होते आणि लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. कशीबशी तिची आई तिच्या मुलीला यातून सोडवते. तरीही दुसरी विद्यार्थीनी संताप व्यक्त करत असते. या भांडणादरम्यान बाजूलाच एक माणूस खुर्चीवर बसून असतो पण त्यांची मदत करायला तो जराही जागेवरून हलत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @mantho_easykadu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल २७.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… “जबाबदारी अशी गोष्ट आहे की…”, ट्रक चालकाचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या माणसाच्या कानशिलात द्यायला हवी, भांडण होतंय आणि गप्पपणे बसून बघतोय. याऐवजी त्याची मुलगी किंवा नात असती तर त्याने हेच केलं असतं का?” तर दुसऱ्याने “मुलींच्या केसमध्ये पडलो तर कोणता ना कोणता कायदा मध्ये येईल, असं काकांना वाटलं असेल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “महिलांचं WWE बघायला मिळतंय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl students fighting on the road terrifying video went viral on social media dvr