Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तरुणी सायकलवर चक्क अतिशय धोकादायक पद्धतीनं स्टंटबाजी करत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावर सायकलवर स्टंट करत असल्याचे दिसत आहे. मुलीचा हा स्टंट खूपच धोकादायक आहे. हँडलवर दोन्ही पाय ठेऊन ती स्टंट करताना दिसत आहे. @dipti_patar143 नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मी पडण्याची वाट पाहत होतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘बाईकनंतर आता सायकल स्टंट.’ त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले की, ‘हे खूप धोकादायक आहे.’
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सलमान खान लग्न कधी करणार? मॅरेज ब्युरोनं जाहिरातीवर लावला “भाईजान”चा फोटो
सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते.
@dipti_patar143नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही.