रोलरकोस्टर राईड ही शांत चित्ताने बसून होईल हे अशक्यच आहे. ही राईड अंगावर काटा आणणारी असते. यादरम्यान तुमच्या चेहऱ्यावर थरारकता आल्या शिवाय राहणारच नाही. मात्र, एका तरुणीने आपल्या भावना दडपून ही राईड करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने रोलरकोस्टरवर नो इमोशन चॅलेंज करण्याचे धाडस केले. परंतु, यात तिला मोठे अपयश आले. राईड करताना तिच्या चेहऱ्यावर जे हावभाव आले, ते पाहून तुम्हाला पोट धरून हसल्यावाचून राहणार नाही. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Isabela Barbosa या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. इसाबेलाने रोलरकोस्टरवर नो इमोशन चॅलेंज पूर्ण करण्याचे धाडस केले. ती रोलरकोस्टरमध्ये बसली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर शुन्य भाव ठेवण्याचे प्रयत्न केले. कुठलेही हावभाव न करण्याच्या हेतूने ती राईडमध्ये बसली. मात्र जेव्हा राईड सुरू झाली तेव्हा तिला इतके झटके बसले की तिच्या भावना उफाळून बाहेर आल्या. प्रत्येक झटक्यावर तिने न हासण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र ते प्रयत्न फोल ठरले.
(अबब.. १६ महिन्यांचं बाळ चक्क निष्णात जलतरणपटू सारखं पोहतय, चपळता आणि वेग पाहून कराल कौतुक)
राईड करताना इसाबेलाच्या चेहऱ्यावरील भावना तिला लपवता आल्या नाही. प्रत्येक झटक्याने तिला हसवण्यास भाग पाडले. झटके लागत असताना तिच्या चेहऱ्यावरील हावभावांनी राईडमध्ये उपस्थित लोकांना चांगलेच हसवले. इसाबेलाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मी प्रयत्न केले, पण अपयशी ठरले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. रोलरकोस्टरवर असे चॅलेंज घेणे हे खरच धाडसाचे काम आहे.
इसाबेलाच्या व्हिडिओला 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप हसवत आहे. एकाने व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्याचे कौतुक केले आहे. तर इसाबेलाचे शांत राहून चेहऱ्यावर हावभाव न आणण्याच्या प्रयत्नांनी अजून हसू येत असल्याचे एकाने म्हटले.