Girls Shocking Video Clip Viral : सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी लोकं स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी किंवा व्हिडीओ काढताना अनेक धक्कदायक घटना घडल्याचे इंटरनेटवर व्हायरल झालेल्या पोस्टच्या माध्यमातून समोर आलं आहे. तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटरसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करणारे अनेक लोकं पाहिले असतील, ज्यांना खतरनाक स्टंटबाजी करायला आवडतं. अशाप्रकारच्या जीवघेण्या स्टंटबाजीमुळे स्वत:च्या जीवाला धोका निर्माण होईल, याचीही पर्वा या लोकांना नसते. असाच एक थरारक व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. एक तरुणी फोटो काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाते आणि त्याचदरम्यान प्रियकर तिचा हात सोडतो. त्यानंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका तरुणीने इन्स्टाग्रामसाठी फोटो खेचण्याच्या अतिउत्साहात स्वत:चा जीव कशाप्रकारे धोक्यात टाकला. तरुणी तिच्या प्रियकरासोबत बिंधास्त राहून रेलिंगवर चढण्याचा प्रयत्न करते. रेलिंगच्या खाली जाळी लावली असल्याने तरुणीला वाटलं की, खाली पडल्यावरी जीव वाचेल. रेलिंगवर लटकून तरुणी फोटो काढत होती, त्याचदरम्यान तिच्या प्रियकराने तिचा हात सोडला. त्याने हात सोडल्यावर ती तरुणी १०-१५ फूट खाली पडली. प्रियकरालाही असं वाटलं की, प्रेयसी जाळीवर जाऊन पडेल. परंतु, जाळीला खूप मजबूतीने बांधण्यात आलं नव्हतं. त्यामुळे जाळीला तरुणीचं वजन पेलता आलं नाही.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Shocking video In Amroha, Uttar Pradesh, a girlfriend was thrown on the road and strangled
VIDEO: जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं! भर रस्त्यात गर्लफ्रेंडच्या हत्येचा प्रयत्न; खाली पाडलं, ओढणीनं गळा आवळला अन्…
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

नक्की वाचा – Viral Video : क्रूरतेचा कळस! रिक्षाचालकाने महिलेला २०० मीटर फरफटत नेलं, कोल्हापूरच्या धक्कादायक घटनेनं खळबळ

इथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओत पाहू शकता की, तरुणी खूप भयानक पद्धतीने खाली पडली. तरुणी खाली पडल्यानंतर तिच्यासोबत काय घडंल, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाहीय. पण ज्याप्रकारे ती खाली पडली ते पाहून तिला किरकोळ दुखापत झाली असल्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ @MoreCrazyClips नावाच्या ट्वीटर यूजरने शेअर केला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तरुणी एक फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने या क्विपवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की, ;लोकं कधीच शिकू शकत नाही’. तर अन्य एका यूजरने प्रश्न विचारला, ती तरुणी वाचली का?. तसं दुसऱ्या एका यूजरने इन्स्टाग्रामवर टीका करत म्हटलं, इन्स्टाग्राम लोकांना मारत आहे.

Story img Loader