सोशल मीडिया स्क्रोल करताना, कधी कोणता व्हिडीओ तुम्हाला खळखळवून हसवेल किंवा कोणता व्हिडीओ तुमच्या डोळ्यात पाणी आणेल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे; आणि त्याचे कारण ठरली आहे एक साडी. नेमके या व्हिडिओमध्ये असे काय आहे ते पाहू.
एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमाद्वारे swatic12 नावाच्या अकाउंटने व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ हा केवळ सहा सेकंदांचा असला तरीही त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या स्त्रीला तिच्या साडीचे किती कौतुक आहे हे तुम्हाला चटकन लक्षात येईल. शेअर झालेल्या या व्हिडीओच्या सुरवातीला एक तरुणी गाडी चालवताना दिसत आहे. तसेच बाजूच्या बाईकवर एका पुरुषाच्या मागे, साडी नेसून बसलेली एक स्त्री दिसते. त्यामध्ये तरुणी त्या महिलेला “भाभीजी पल्लू पल्लू” [काकू तुमचा पदर] असे म्हणून, पदर कुठे अडकू नये यासाठी सावध करते. मात्र त्या काकूंचे भन्नाट उत्तर ऐकून तरुणीदेखील खळखळून हसते.
हेही वाचा : “आई मला काहीतरी पाहिजे…” म्हणत चिमुरडीने केले हैराण! पाहा हा मजेशीर व्हायरल Video
तरुणीने काकूंना हाक मारल्यावर, काकूंनी मात्र, “पंधरासो का है” असे म्हणत त्यांनी नेसलेली साडी ही पंधराशे रुपयांची असल्याचे अगदी कौतुकाने सांगितले. हे सांगताना ती महिला आपल्या हातात पदर पकडून तो दाखवण्याचाही प्रयत्न करते. काकूंच्या उत्तरावर तरुणी हसते आणि त्यांना परत समजावून सांगते कि, “काकू तुमचा पदर खाली लटकत आहे, असे मला म्हणायचे होते.” एवढे बोलून व्हिडीओ संपतो.
खरंतर अनेक दुचाकी चालकांना, ओढणी, पदर, ड्रेसचे टोक असे काही चाकाजवळ लटकताना दिसले कि ते त्या व्यक्तीला सावध करतात. इतकेच नाही तर बऱ्याचवेळा दुचाकी चालवताना त्याचा साईड स्टॅन्ड वर करायचा राहून गेलेला असतो. तो वर करण्यासाठीसुद्धा अनेकजण असे अशा पद्धतीने मदत करतात. मात्र काकूंनी दिलेली ही प्रतिक्रिया खूपच मजेशीर होती.
हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर काय प्रतिरकीय दिल्या आहेत ते पाहू.
“या महिन्याचे सर्वात भारी मीम आहे हे” असे एकाने लिहिले आहे. “५०० रुपयांची आहे..” असे दुसऱ्याने म्हंटले आहे. तर अनेकांनी यावर हसण्याच्या ईमोजी दिलेल्या आहेत.
हेही वाचा : ‘टिश्यू पेपर’ने बनवा मोगऱ्याचा गजरा! पाच मिनिटांत करून बघा ‘हा’ जुगाड! पाहा Video…
हा व्हिडीओ @swatic12 या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटने शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ६८३.९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.