आजकाल प्रत्येकजण रिल्स बनवताना दिसते. काही लोक सार्वजनिक ठिकाणी, ट्रेन, मेट्रोमध्ये रिल्स तयार करत असतात. कोणी डान्स करताना दिसते तर कोणी काही रस्त्यावर व्यायाम करताना दिसते. दरम्यान, सोशल मीडियावर डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी रिल्ससाठी सार्वजनिक ठिकाणी नाचताना दिसत आहे आणि एक मद्यपीही तिची नक्कल करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक तरुणी ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. तेव्हा शेजारी उभा असलेले लोक तिच्याकडे पाहत असतात. तेवढ्यात मागून एक मद्यपी येतो आणि तिच्यासारखा नाचू लागतो. दरम्यान, मद्याच्या नशेत असलेला हा व्यक्ती तरुणीची हूबेहुबे नक्कल करत आहे. लोकांना हा व्हिडीओ व्हायरल होत असतात.
व्हिडीओ सोशल मीडियावर फ्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर bhoomi_gandhi24 नावाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर काही जण या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
हेही वाचा – निष्काळजीपणे बाईक चालवत होती तरुणी, स्वत:ही पडली अन् इतरांनाही पाडले; व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
लोकांनी व्हिडीओमधील तरुणीपेक्षा तिच्या मागे उभे असलेल्या मद्यपीचा डान्स आवडत आहे. लोकांनी त्याचे खूप कौतूक करत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे लक्ष तरुणीपेक्षा जास्त मागे नाचणाऱ्या मद्यपीकडेच जात आहे.
हेही वाचा – ऐकावे ते नवलंच! स्वत:च्याच लग्नात नवरदेव चिरतोय कोबी; विश्वास बसत नसेल तर पाहा व्हायरल व्हिडीओ
एकाने लिहिले, “या मद्यपीने तुमच्या नृत्याची शोभा वाढवली” तर दुसरा म्हणाला की, “मागे वळ आणि तुझ्या प्रेमीला (दिलबर) भेट” तर तिसऱ्याने सांगितले की, “५० टक्के क्रेडिट या व्यक्तीचे आहे असे कोणाकोणाला वाटते?” चौथै व्यक्ती म्हणाला,”मागचा व्यक्ती जास्त चांगला डान्स करत आहे. आणखी एकजण म्हणाला, “कोण कोण मागच्या व्यक्तीकडे पाहत आहे”