आपल्यावर शस्त्रक्रिया होणार या भीतीने अनेकांचे हातपाय गळतात. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही शस्त्रक्रियेबद्दल आपल्या मनात एक स्वाभाविक भीती असतेच. मग डॉक्टरांकडून रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकांची मानसिक तयारी करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात. या शस्त्रक्रियेदरम्यान एक लहानशी चूक झाली तरीही ती रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. मात्र, चेन्नईत नुकतीच एका मुलीवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. दहा वर्षांच्या या मुलीवर चेन्नईतील रुग्णालयात ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी ही मुलगी आपल्या काकांच्या मोबाईलवर तिचा आवडता कँडी क्रश हा गेम खेळत होती. पाचवीत शिकणाऱ्या या मुलीला अचानक चक्कर यायला लागल्याने तिच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी तिच्या मेंदूत ट्यूमर असल्याचे लक्षात आले होते. त्यानुसार शस्त्रक्रिया करुन हा ट्यूमर काढण्याचे ठरले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा