जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सिंह एक आहे. शिकारीच्या बाबतीत तर सिंह खूपच तत्पर आणि धोकादायक आहे. तो त्याची शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात त्याच्याविषयी दहशत आहे. एकदा का प्राणी त्यांच्या तावडीत आला की त्यातून सुटणे अवघडच नाही तर अशक्यही होते. सिंहाच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कारण, एक तरुणी चक्क सिंहाच्या बाजूला बसून एकाच ताटात जेवत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा सिंह बसून ताटामध्ये मांस खात आहे. एक तरुणी त्याच्या शेजारी बसून त्याच्या ताटातील खात आहे. हे दृश्य पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. तरुणीचं धाडस पाहून थक्क व्हाल. संयुक्त अरबमधील वाईल्ड लाईफ पार्कमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. ही तरुणी सिंहाच्या बाजूला बसून एकाच ताटात जेवत आहे. वाघ कच्च मांस खाताना दिसत आहे, तर तरुणी चिकनसारखं काहीतरी खात असताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताना भिती वाटत आहे. एका क्षणाला ताटतलं मांस संपलं आणि जर सिंहाने तरुणीवर हल्ला केला तर अशी भिती नेटकरी व्यक्त करत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Shocking video: पिल्लासाठी आई झाली उदार! ७ सिंहासोबत एकटीने केला संघर्ष, शेवटी मात्र…
@rak_zoo नावाच्या अकाऊंटवर या तरुणीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी तरुणीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. तर काहींना असं धाडस जीवाशी येऊ शकतं असं म्हटलं. दरम्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. हल्ल्याच्या अनेक भयंकर आणि धोकादायक व्हिडीओ समोर येत असतात. शिकारीसाठी प्राणी जीवाची बाजी लावताना दिसून येतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांचीही चांगली पसंती असते. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचाही वर्षाव होताना दिसतोय