जगात असे अनेक लोकं आहेत ज्यांना नदीच्या पाण्यात अंघोळ करायला किंवा पाण्यात खेळायला प्रचंड आवडते. पण अशा ठिकाणी गेल्यावर लोकांकडून नकळत अशा काही चुका होतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी नदीकाठी तोंड धुवायला जाते पण तिच्या सोबत असे काही घडते की पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये एक तरुणी वेगाने वाहणाऱ्या नदीच्या काठावर उभी असलेली दिसत आहे. उन्हापासून आराम मिळावा म्हणून तिने थंड पाण्याने चेहरा धुण्यास सुरुवात केली. पण या दरम्यान बिचारीच्या एका चुकीने मोठे नुकसान झाले. मुलगी पाण्यात चेहरा धुवत असताना तिच्या शर्टच्या खिशात ठेवलेला स्मार्टफोन वाहत्या नदीत पडला. मोबाइल पाण्यात पडल्याचे तिला समजताच तिला धक्काच बसला आणि ती ओरडू लागली. पण वाहत्या नदीतून मोबाईलला बाहेर काढणे अशक्य होते. दुर्दैवाने मुलीला हताश होऊन तिथून निघावे निघावे लागले.

तरुणीला एक चूक महागात पडली..

( हे ही वाचा: लांडग्यासारखे दिसण्यासाठी तरुणाने खर्च केले तब्बल १८ लाख रुपये; म्हणाला “टीव्हीवर मला…”)

व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल..

तरुणीचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. हा इंस्टाग्रामवर sakhtlogg या हँडलने शेअरही केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. अशाच एका यूजरने लिहिले की, ‘बिचारीचे खूप मोठे नुकसान झाले.’ तर अजून एकाने लिहिले की, ‘व्वा! क्या बात है.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl was washing her face in river water but sudden harm herself watch this viral video gps