Girl Wearing Bikini In Delhi Metro Viral Video: अलीकडेच एका तरुणीने दिल्ली मेट्रोतून ट्रेंडी ब्रा आणि मिनी स्कर्ट घालून प्रवास केला होता. संबंधित तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. संबंधित तरुणी ही विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदची बहीण तर नाही ना? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला. या सर्व घडामोडीनंतर ट्रेंडी ब्रा आणि मिनी स्कर्ट परिधान करणाऱ्या ‘त्या’ तरुणीने प्रतिक्रिया दिली आहे. आपण गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतून अशाच प्रकारे प्रवास करत आहोत, असा खुलासा तिने केला आहे.
रिदम चन्ना असं संबंधित तरुणीचं नाव असून ती १९ वर्षांची आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रिदम चन्नाने सांगितलं, “मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे. हे मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाहीये. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? याची मला पर्वा नाही. मी उर्फी जावेदचं अनुकरण करत नाहीये. माझ्या एका मित्राने अलीकडेच मला उर्फीचा फोटो दाखवला. तोपर्यंत उर्फी कोण आहे? हे मला माहीत नव्हतं.”
हेही वाचा- Video Viral: ट्रेंडी ब्रा आणि मिनी स्कर्टमध्ये मेट्रोत दिसली; नाही ही ‘उर्फी’ नाही…
माझे कुटुंबीय माझ्या कपड्यांच्या निवडीवर नाखूश आहेत. मला माझ्या शेजाऱ्यांकडून नियमित धमक्या मिळतात. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? याची मला पर्वा नाही, असंही रिदमने पुढे सांगितलं.
बिकीनी परिधान करत तरुणीचा दिल्ली मेट्रोतून प्रवास (VIRAL VIDEO)
“असे कपडे परिधान करण्याचा निर्णय एका दिवसात घेतला नाही. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. मीदेखील एका पुराणमतवादी कुटुंबातील आहे. माझ्या घरात मला जे हवे होतं, ते करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे एकेदिवशी मी मला हवं तसं वागण्याचा निर्णय घेतला, कारण हे माझं जीवन आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी असाच प्रवास करत आहे. पण आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मला दिल्लीच्या पिंक लाईनवर प्रवास करण्याची परवानगी नाकारली आहे. परंतु इतर कोणत्याही लाईनवर मला अशा समस्येचा सामना करावा लागला नाही,” असंही रिदम चन्नाने सांगितलं.