Viral Couple Love Story: पाश्चिमात्य देशांमध्ये ब्लाइंड डेट ही संकल्पना फार प्रचलित आहे. भारतातही मेट्रो शहरांमध्ये हे ट्रेंड फॉलो केले जातात. याचा थोडक्यात अर्थ सांगायचा तर, तुम्ही ज्या व्यक्तीसह डेट वर जाणार आहात ती व्यक्ती कोण हे तुम्हाला ठाऊक नसतं. साधारण तुमचे कॉमन मित्र मंडळी तुम्हाला एकत्र आणण्यासाठी प्लॅन करतात. काही वेळा तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं नावही माहित नसतं. काही वेळा यातून अगदी सुंदर नातं तयार होऊ शकतं तर कधी तुम्ही विचारापलीकडे जाऊन निराश होऊ शकता, साधारण अशा वेळी डेट लगेच संपवली जाते. पण जर समजा त्याच वेळी तुम्हाला असं कळलं की तुम्हाला तुमच्या ब्लाइंड डेटसह १० दिवस एकाच खोलीत राहावं लागणार आहे, तर…?
असाच काहीसा प्रकार एका जोडप्यासह घडला होता. अलीकडेच त्या दोघांनी आपला अनुभव शेअर केला आहे. करोनाचे लॉकडाऊन लागू असताना एक मुलगा आणि एक मुलगी ब्लाइंड डेटवर भेटले होते. एका खोलीत त्यांची ही डेट ठरली होती. आणि नेमका तेव्हाच लॉकडाऊन जाहीर झाला. या दोघांना लॉकडाऊनमध्ये दहा दिवस एकत्रच राहावे लागले.
आता १० दिवस एकत्र अनोळखी माणसासह राहणं काही सोप्पं नाही पण कदाचित त्यांची डेट इतकी कमाल झाली होती की त्यांना हे दहा दिवस एखाद्या स्वप्नासारखे जगता आले. दोघांनी एकत्र स्वयंपाक केला, भरपूर गप्पा मारल्या, आपल्या आवडी-निवडीबद्दल,या काळात बाहेर कोरोनामुळे खूप कडक नियम बनले होते आणि लोकांना नियम पाळावे लागले होते. या जोडप्याने त्यांच्या घरी असेही सांगितले की ते सुरक्षित आहेत आणि ते त्यांच्या मित्रांसह अडकले आहेत.
हे ही वाचा<< Video: नवरोबांची कंबर मोडून ‘ती’ उड्या मारू लागली; मंडपाऐवजी हॉस्पिटलला पोहोचली वरात, असं घडलं तरी काय?
दरम्यान, साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, नियम शिथिल झाल्यावर जेव्हा ही दोघं बाहेर आली तेव्हा त्यांनी थेट लग्न करत असल्याचं सांगितलं. आधी त्यांचे मित्र, कुटुंबीय सगळ्यांनाच या गोष्टीने धक्का बसला पण नंतर पूर्ण कहाणी ऐकता सर्वांनी आनंदाने या लग्नाला होकार दिला.