Viral funny photo: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा आश्चर्याचा धक्का देणारे तर कधी मजेशीर अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकांना नोटांवर काही ना काही लिहण्याची सवय असते. अशा संदेश लिहिलेल्या नोटा तुम्ही सोशल मीडियावर देखील पाहिल्या असतील. कधी कोणी प्रियकर-प्रेयसीला मेसेज पाठवते, तर कधी कोणी त्यावर नंबर लिहून ठेवते. अशा अनेक भन्नाट असे मेसेज पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही वर्षांपूर्वी, ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहलेली एक भारतीय चलनी नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली. यावरून बरेच मीम्स बनवले गेले. आता असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गर्लफ्रेंडनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी ५० रुपयांच्या नोटेवर एक गोष्ट लिहून ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुर्वीच्या काळी कबुतराच्या माध्यमातून प्रेम संदेश पाठवला जायचा. मात्र आता संपर्क करण्याची साधने बदलली आहेत. सोशल मीडियाच्य काळातही आजही अनेकजण नोटेवर संदेश पाठवताना दिसत आहेत. अशाच या नोटेवरचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर अनिकेतच्या नावानं ५० रुपयांची नोट व्हायरल होत आहे. ही नोट पूजा नावाच्या मुलीनं लिहिलेय. ती म्हणतेय, “सागर आता माझं लग्न झालं आहे आता तरी मला भेटायला ये, मी वाट बघत आहे. तुझीच पूजा” संपूर्ण मेजेस वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल तसेच अनेकांना त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण होईल. या नोटेमार्फत पूजानं आपल्या एक्स प्रियकराला सिक्रेट मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. पण हा मेसेज बहुदा फेल गेला असल्याची शक्यता आहे. कारण ही नोट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

पाहा नोटेचा फोटो

आता दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र करणाऱ्यांची कमी नाही. किती तरी लोक असे आहेत, जे अशा कपलला भेटवण्यासाठी जमीन-आकाशही एक करतात. ही नोट किंवा ही पोस्ट पाहिल्यानंतरही असंच काहीसं घडतं आहे.या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी याला गांभीर्याने घेतलं आणि आपण सागर-पूजा यांना भेटवणारच असा निश्चय केला आहे. पूजाचा हा मेसेज त्या सागरपर्यंत पोहोचवण्यासाठी काहींनी धडपड सुरू केली आहे. तर काही लोकांनी हे मजेत घेत त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl write message for ex boyfriend on 50 rs note funny photo goes viral on social media srk