सध्या सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रेयसींच्या प्रेमाबाबतच्या अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कधी प्रियकराला परीक्षेत पास करण्यासाठी प्रेयसीने धोका पत्करुन पेपर दिल्याची बातमी असेल तर कधी तरुणीने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी लाखो रुपये धुडकावल्याची बातमी व्हायरल होते. अशा अनेक बातम्या आपण पाहत असतो.

अशातच आता एका जोडप्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्याच कारणही तसंच खास आहे. ते म्हणजे, एका तरुणीने तिच्या प्रियकराला चक्क खांद्यावर घेऊन घरापर्यंत चालत गेल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर नशेत असल्यामुळे त्याला चालता येत नव्हतं, त्यामुळे प्रेयसीने त्याला उचलून घरापर्यंत घेऊन गेल्याचा व्हिडिओ टिकटॉकवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने दिलं आहे.

zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
blonde roasts Coffee Health Benefits
Varun Dhawan: ब्लॅक कॉफी व्यतिरिक्त ‘हा’ पर्याय आतड्यासाठी ठरेल योग्य; वरुण धवनने सुचवला उपाय; पण, तज्ज्ञांचे मत काय?
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट
Tejashri Pradhan First Post Share after exit premachi goshta serial
“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “तुमची कुवत…”
person beaten Bhiwandi, Thane, person was beaten,
ठाणे : लघुशंका करण्यास मनाई केली म्हणून मारहाण
Video of womans simple act of kindness amasses 24 million views
इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओ! एकटाच खेळत होता चिमुकला, तरुणीच्या प्रेमळ कृतीने जिंकले नेटकऱ्यांचे मन

हेही पाहा- नववर्षाचा उत्साह एवढा की किस करताना पडदा ठेवला उघडा; मरीन ड्रायव्हवरील ‘तो’ Video होतोय व्हायरल

nypost.com च्या रिपोर्टनुसार, ही घटना नववर्षाच्या पुर्वसंध्येची आहे. एक तरुणी तिच्या प्रियकरासोबत पार्टीला गेली होती. त्यावेळी प्रियकराने जास्त ड्रिंक केल्याने त्याला नशा चढली, ज्यामुळे त्याला चालताही येत नव्हते. आपल्या प्रियकराला चालता येत नसल्याचं तरुणीला समजताच तिने प्रियकराला खांद्यावर उचललं आणि ती घरच्या दिशेने चालू लागली. हे दृश्य पाहून रस्त्यावरचे लोक आश्चर्यचकित झाले होते.

हेही पाहा- Viral Video: सायकलस्वाराचा आत्मविश्वास पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले “आयुष्यात एवढं बिनधास्त…”

या जोडप्याचा ११ सेकंदांचा व्हिडिओ पहिल्यांदा टिकटॉकवर अपलोड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर या व्हिडिओमध्ये त्या घटनेच्या स्थळाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवाय त्यावर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्याची सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओवर एका युजरने, ‘अशी जोडीदारीन मिळणे अवघड आहे.’ अशी कमेंट केली तर आणखी एकाने, ‘जोडीदार असावा तर असा’ अशी कमेंट केली आहे. तर काही युजर्सनी हा व्हिडिओ Prank होता असंही म्हटलं आहे. ही तरुणी तिच्या प्रियकराला खांद्यावर घेऊन जात असताना तिच्याकडे आजूबाजूला लोक आश्चर्यचकीत होऊन बघत होते. त्याचवेळी काही लोकांनी या जोडप्याचे हे कृत्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केलं, जे आता व्हायरल झाले आहे.

Story img Loader