प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजकाल गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल भररस्त्यात लज्जास्पद कृत्य करताना दिसतंय.

Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
uddhav thackeray on nirmala sitharaman budget 2025
12 Lakh Income Tax: ‘एका सामान्य कुवतीच्या महिलेने…’, निर्मला सीतारमण यांचा उल्लेख करत ठाकरे गटाची टीका; १२ लाखांच्या मुद्द्यावर मांडली भूमिका!
international-space-station-seen-in-indian-skies
Video: पुणे-मुंबईतून आकाशात दिसलं दुर्मिळ दृश्य; कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहायला मिळालं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक!
Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
couple Decampsa
पतीची किडनी विकून प्रियकराबरोबर पसार; माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने खळबळ

भररस्त्यात अश्लील चाळे

सध्या सोशल मीडियावरील हा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भररस्त्यात एका तरुण आणि तरुणीचे अश्लील चाळे सुरू आहेत. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुणी दोन तरुणांबरोबर एका रस्त्याच्या कडेला उभी आहे. यातला एक तरुण खाण्यात मग्न आहे, तर तरुणी दुसऱ्या तरुणाला किस करताना आणि अश्लील चाळे करताना दिसतेय. आजूबाजूने माणसं जातायत तरीही त्यांना कशाचंही भान नाही, असं या व्हिडीओमधून दिसतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @lacustre_revista या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३.३ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान हा अश्लील प्रकार नेमका कुठे घडला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

या तिघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे चाललंय काय”, दुसऱ्याने “यांनी तर लाजच सोडली आहे” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “अगं जरा तरी भान ठेव, भररस्त्यात असं करताना हिला काहीच कसं वाटत नाही.”

Story img Loader