मुलगी या कायमच वडिलांच्या जवळची असते. मुलीचं प्रेम आईपेक्षा सर्वाधिक आपल्या बापावर असतं. बाप लेकीच नातं हे जगातल सगळ्यात सुंदर नातं असतं. बाबाच्या जवळीची व्यक्ती जर कुणी असेल तर ती मुलगी. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपर हिरो असतात अशा परिस्थितीत वडीलही मुलीसोबत सर्व काही शेअर करतात.

पण वयात आलेली मुलगी ही प्रत्येक वडिलांची चिंतेची बाब असते. मुलगी वयात आली की प्रत्येक वडील तिच्या सुरक्षेची काळजी जास्त करत असतात. अशीच एका चिंतेत असलेल्या वडिलांची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तरुणीच्या बेडरूममध्ये तिचा बॉयफ्रेंड नको त्या अवस्थेत असताना वडील तिथे आले. त्यानंतर तरुणाला अंडरवियरवर बाल्कनीतून पळण्याची वेळ आली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहे.

लेकीला बॉयफ्रेंडसोबत वडिलांनी पाहिलं

लेक ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते, लहानपणापासून वडिल लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतात. मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर वडिलांच्या विरोधात जात असेल तर, कोणत्याही वडिलांवर दुख:चा डोंगर कोसळेल. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  झालं असं की, पालक घरी नाही म्हणून तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे बेडरूममध्ये रोमान्स करत असताना अचानक तरुणीचे वडील घरी आले. त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडताच लेकीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला ते नको त्या अवस्थेत पाहतात. यावेळी त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते त्या तरुणाला मारण्यासाठी धावतात. याचवेळी तो तरुण बाल्कनीतून एक लांब चादरीच्या मदतीने पळण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती तरुणाला पकडण्यासाठी धडपड करत असताना तरुणी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘१४ ऑगस्ट नॅशनल ‘Sick Leave’ घोषित करा’, वीकेंडचा आनंद घेण्यासाठी कारणं देऊन सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मीम्स व्हायरल

आपल्या पाल्याला आनंदी ठेवण्यासाठी पालक सर्वस्वाचा त्याग करतात, मात्र मुलं पालकांचा विश्वासघात करतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी मुलीवर टीका करत प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader