Girlfriend Boyfriend Viral Video : नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या नात्यात जोडीदार एकमेकांवर मनापासून प्रेम करतात व हक्क गाजवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाबरोबर एका तरुणीला फ्लर्ट करणे चांगलेच महागात पडले. तरुणीने फ्लर्ट करताच तरुणाच्या गर्लफ्रेंडनी तिचे केस ओढत तिला चांगलीच अद्दल घडवली. त्यानंतर दोघींमध्ये चांगलीच जुंपली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (girlfriend gets angry when another girl flirts with her boyfriend)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जोडपे शॉपिंग मॉलमध्ये एका एक्सीलेटरवरून खाली उतरत होते. मुलगा समोर उभा होता आणि त्याच्या मागे त्याची गर्लफ्रेंड उभी होती. तर बाजूच्या एक्सीलेटरवरुन एक तरुणी वर जात होती. तितक्यात तिची नजर या मुलावर जाते आणि ती त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करते. हे पाहून मागे उभी असलेल्या तरुणाच्या गर्लफ्रेंडचा राग अनावर होतो आणि त्या तरुणीचे केस ओढत तिला खाली उतरवते आणि त्यानंतर दोघींमध्ये जोरदार भांडण होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कदाचित फ्लर्ट करणारी तरुणी प्रँकस्टार असावी आणि जर असे असेल तर हा प्रँक मात्र तिला महागात पडला.
पाहा व्हायरल व्हिडीओ
ThebestFigen या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुझी हिम्मत कशी झाली?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रँक करणाऱ्या लोकांबरोबर असेच व्हायला पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप वाईट प्रँक होता”
आणखी एका युजरने लिहिलेय, “मी सुद्धा तिच्या जागी असते तर हेच केले असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे १०० टक्के स्क्रिप्टेड आहे” अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये प्रँकचे व्हिडीओ सुद्धा शेअर केले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा असेच अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका बॉयफ्रेंडवरुन दोन तरुणी मारहाण करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चत आला होता.