Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दूध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही”, मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे, पण कधीतरी ते सापडतातच. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. गर्लफ्रेंडला भेटायला घरी आलेला बॉयफ्रेंड चांगलाच गोत्यात येतो, कारण मुलीचे आई-वडील नेमके घरी येतात. मात्र, यावेळी गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडला कुठे लपवून ठेवते अन् नंतर काय झालं ते तुम्हीच पाहा..

 अनेकदा प्रेमात पडलेल्या या तरुणांना आपण नेमकं काय करतोय याची तितकी समजही नसते. सोशल मीडियावर पहिल्या प्रेमाबाबत तुम्ही अनेकदा वाचले असेल किंवा ऐकले असेल. कधी प्रेमामुळे आई-वडिलांकडून मार, तर कधी आई-वडिलांपासून लपवलेले प्रेम असे अनेक प्रेमाचे भन्नाट किस्से तुम्ही ऐकले किंवा वाचले असतीलच. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणीनं घरात कुणी नसल्याचा फायदा घेत बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, मात्र तिचा असा पचका झाला की तिला बॉयफ्रेंडला चक्क पेटीमध्ये लपवावं लागलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धरालं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी खाली बसली आहे, तिला घरचे कोणी आलेलं का? कोणी आहे का? असे अनेक प्रश्न विचारत आहेत. त्याचवेळी कुटुंबातील महिला मुलीला ओरडत आहेत. मात्र, ही तरुणी त्यांना असं काहीच नसल्याचं सांगत आहे. मात्र, शेवटी तो तरुण चक्क पेटीमध्ये लपून बसलेला आढळतो. यावेळी त्याला बाहेर यायला सांगतात; तोही बाहेर येतो आणि यावेळी घरात आरडा ओरडा सुरू होतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “तू नुसतं पदराला बांंधायचं राहिलंय गं” बायकोला वैतागलेल्या नवऱ्यानं गायलं भन्नाट गाणं; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक आणि शेअर मिळत आहेत. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

Story img Loader