युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, असं म्हटलं जातं. शिवाय प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराला पाहण्यासाठी त्याला भेटण्यासाठी काहीही करायला तयार असते. सध्या बिहारमधील अशीच एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये प्रियकराला भेटण्यासाठी एका प्रेयसीने असं काही केलं आहे, जे समजल्यावर तुम्हीदेखील थक्क व्हाल. हो कारण घटनेतील तरुणीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी संपूर्ण गावाला अंधारात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसी तिच्या प्रियकराला ज्या ट्रान्सफॉर्मरद्वारे गावात वीजपुरवठा केला जातो, त्याच ट्रान्सफॉर्मरची वीज कट करायला सांगायची. ज्यामुळे संपूर्ण गावातील लाईट जायची आणि मग हे दोघे अंधारात एकमेकांना भेटायचे. गावातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावात चोरीच्या घटनाही घडू लागल्या होत्या. त्यामुळे गावातील लोक सावध झाले आणि असेच एक दिवशी प्रियकर आणि प्रेयसी लाईट बंद करुन एकमेकांना भेटत असताना त्यांना काही लोकांनी पकडलं. यावेळी पाच ते सात लोकांनी मिळून प्रियकराला बेदम मारहाणही केली. यावेळी तरुणीने आपल्या प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्नदेखील केल्याचं सांगितलं जात आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…

हेही वाचा- VIDEO: टोल भरण्यावरून राडा! ओळखपत्र मागितल्यानं महिलेला भयंकर मारहाण, केस ओढत लाथा बुक्क्यांनी..

गावातील लोकांनी घटनेतील प्रियकराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होताच संतापलेल्या प्रियकराने आपल्या काही मित्रांना बरोबर घेऊन मारहाण करणाऱ्या गावकऱ्यांच्या घरांची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या मित्रांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये नेलं.

दरम्यान, दोन्ही बाजूच्या लोक पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तरुणीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्याचे मान्य केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित होते. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने तोडगा निघाला आहे. पण सध्या या प्रेमप्रकरणाची सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा सुरु आहे.

Story img Loader