Girls Bold Dance Viral Video : मुंबईतील नाईट लाईफ, डीजे पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री मोठ मोठ्या पार्ट्यांमध्ये थिरकताना व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत असतात. पण इंटरनेटवर सध्या मुंबई बाहेरील एका व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. कारण दोन तरुणींनी त्यांच्या बोल्ड अंदाजात लाखो नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. संपूर्ण देशभरात नाईट लाईफ आणि पार्टी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चंदीगढच्या एका व्हायरल व्हिडीओनं अनेकांना ठुमके मारायला भाग पाडलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी झालेल्या न्यू ईयर पार्टी सेलिब्रेशनमध्ये चंदीगढच्या तरुणींनी धुडगूस घातला होता. बोल्ड अंदाजात डान्स करत लाखो चाहत्यांची वाहवा मिळवणाऱ्या या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

….म्हणून तरुणींच्या बोल्ड डान्सचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला

व्हायरल झालेल्या व्हिडीओत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शेकडो लोक डीजे पार्टीत थिरकताना दिसत आहेत. पण या पार्टीत दोन तरुणींनी केलेला बोल्ड डान्सनं लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण बोल्ड डान्सचा फिव्हर चढलेल्या या तरुणींनी पंजाबी गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावल्याचे या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांचा उंदड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तरुणी डीजेच्या तालावर भन्नाट डान्स करून लोकांचं मनोरंजन करताना या व्हिडीओत दिसत आहेत. इंटरनेटवरील तमाम नेटकऱ्यांनाही या तरुणींच्या अदांची भुरळ पडली आहे. कारण व्हायरल झालेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

नक्की वाचा – Video : बेडरूममध्ये नको ते उद्योग करायला गेली अन् झाली फजिती, तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

चंदीगढ द ब्यूटीफुल सिटी नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १ जानेवारीला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १.३ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर ४८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तसंचे शेकडो नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. काही जणांनी या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ चंदीगढचा नसल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर काही नेटकरी म्हणाले, “हा व्हिडीओ न्यू इयर पार्टीचा नाही आहे.” एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “ही खरंच न्यू इयर पार्टी आहे? कारण कुणीही थंडीपासून संरक्षण करणारे कपडे घातलेले नाहीत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls bold dance in chandigarh new year night party millions of people crazy reactions on dj party viral video nss