Girls dance video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; काही जण फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशा विविध प्रकारच्या डान्सचा आधार घेत असतात. तर काही जण फक्त स्वत:च्या मजा, आनंदासाठी तो क्षण एन्जॉय करत असतात.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी बनवलेल्या रील्स पाहायला मिळत आहेत. तसंच ‘काळी बिंदी’ हे गाणं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यावरही लाखो लोकांनी डान्स करत रिल्स बनवल्या. सध्या याच गाण्यावर एक चिमुकली थिरकली आहे आणि तिच्या या डान्सने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.
लहान मुलीच्या डान्सने घातली भुरळ
सोशल मीडियावर सध्या या मुलीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. यात या लहान मुलीने शाळेच्याच गणवेशात एक उत्तम डान्स परफॉरमन्स केला आहे. गुलाबी साडी फेम संजू राठोडचं ‘काळी बिंदी’ गाणं गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतंय. याच गाण्यावर ही शाळकरी मुलगी थिरकली आहे. डान्स कोरिओग्राफरबरोबर तिने या गाण्यावर डान्स केला आहे. अगदी हुबेहुब डान्स स्टेप्स करत तिने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आहे.
लहान मुलीच्या डान्सचा हा व्हिडीओ @maheshpawar_steppers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला १६ लाखांच्या वर व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप छान डान्स केला मुलीने”. तर दुसऱ्याने “खूप सुंदर” अशी कमेंट केली.
यादरम्यान, याआधीही लहान मुलांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, सध्या हे गाणं चर्चेत असल्यामुळे आणि चिमुकलीच्या डान्समुळे या व्हिडीओची चर्चा सर्वत्र रंगते आहे.