Viral video: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला. की पुढच्या काही क्षणात तो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये येतो. तसेच आजकाल तरुणाईमध्ये जुन्या मराठी गाण्यांचाही ट्रेंड आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच काही तरुणींचा मराठमोळ्या गाण्याचावरचा जबरसदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी “शोला हूँ मैं, बिजली भी हूँ, ना खेल यूँ आग से…” या गाण्यावर डान्स केलाय. यावेळी दोघींनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसल्या आहेत. त्यांच्या अदा आणि भाव पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

डान्स व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि एकेक अदा इतक्या सुंदर आहेत की पाहणाऱ्याला आपोआप भुरळ पडते. त्यांच्या या अदांवर नेटकऱ्यांनीही चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरुणीच्या डान्स प्रमाणेच तिच्या लूकनेही पाहणाऱ्यांना चांगलेच वेड लावले आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ khushizakharia नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय ती अदा काय तो डान्स” तर आणखी एकानं, जबरदस्त डान्स केलाय अशी प्रतिक्रिया दिलीय.