अनेकदा क्षुल्लकशा गोष्टीवरून माणसांमध्ये वाद होतात. शहाणे लोक बोलून, समजुतीने वाद मिटवतात; पण ज्यांना मुद्दाम भांडण करायचंच असतं, ते समजून न घेता आपला भांडणाचा पवित्रा कायम ठेवतात. कधी कधी असे वाद रौद्र रूप धारण करतात आणि मग अशा भांडणांचं रूपांतर मारामारीत होतं. अशात पुरुषांची मारामारी जितकी भयावह असते, त्यापेक्षा आजकाल तरुणींमध्ये होणारे वाद हिंस्र रूप धारण करताना दिसतात.
भांडणाच्या नादात तरुणी नकळतपणे त्या एकमेकांच्या झिंज्या उपटण्यापर्यंत पोहोचतात. अशा भांडकुदळ मुलींना भांडणासाठी कारण लागत नाही. सोशल मीडियावर असे असंख्य व्हिडीओ दर दुसऱ्या मिनिटाला व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात दोन तरुणींचं जोरदार भांडण होतं आणि त्या भांडणाचं पर्यवसान मारामारीत होतं.
व्हायरल व्हिडीओ
महाविद्यालयामध्ये भरवर्गात दोन मुली भांडताना दिसतायत. या भांडणात एक तरुणी दुसऱ्या तरुणीचे केस जोरात ओढताना दिसतेय, तसेच ती अगदी बेंचवर चढून दुसऱ्या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसतेय. हाणामारीपर्यंत पोहोचलेलं या दोघींचं हे भांडण तेथे जमलेल्या गर्दीतील काही जण सोडवून, दोघींना वेगळं करतात.
हा व्हिडीओ @narendra_lodha1590 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला look at her hair strength (तिच्या केसांची ताकद बघा), अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “त्या निळ्या टॉप घातलेल्या तरुणीनं दुसरीला बेदम मारलं.” दुसऱ्यानं, “हे खूप वेदनादायक आहे,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “या मुलींचे असले कसले संस्कार” “कॉलेजमध्ये शिकायला येतात की मारामारी करायला” अशी कमेंटदेखील एकानं केली.
दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात तरुणी एकमेकींना मारहाण करताना दिसत होते. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ काही दिवसांपासून चर्चेत आहे. परंतु, ही घटना नेमकी कुठे घडली आणि या तरुणींमधील वादाचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप कळू शकलेलं नाही.