शॉपिंग म्हणजे बऱ्याच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही कुठे सेल लागला असेल तर तिथं अशा महिला आवर्जून जातात. अशाच एका दुकानात सेल लागला. जिथं शॉपिंगसाठी महिला अक्षरशः एकमेकींच्या जीवावर उठल्या. दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी दुकानातच राडा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. महिलांचं भांडण तसं नवं नाही. सार्वजनिक नळ असो वा मुंबईची लोकल तिथं महिलांना भांडताना तुम्ही पाहिलं असेल. पण आता तर महिलांनी मॉलही सोडला नाही. मॉलमध्ये सेल लागला. तिथंही महिला मारहाण करताना दिसल्या. व्हिडीओ पाहून तुमचीही या भांडणावरून नजर हचणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वीही मुली एकमेकींना भिडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दरम्यान सध्या एका वायरल व्हिडिओ मध्ये २ महिला एका सेम ड्रेससाठी भिडल्याचं पहायला मिळालं आहे. दोघी सेम ड्रेसवरुन एकमेकींना भिडल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन महिला एकमेकींचे केस पकडून अक्षरश: हाणामारी करत आहेत. आजुबाजुचे लोक या महिलांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दोघींही एकायला तयार नाही. महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – बापानी कष्ट करावं अन् पोरांनी मोल करावं! अफाट कष्टानंतर लेक आर्मीत भरती झाला, पाहताच मिठी मारुन रडू लागले बाप-लेक..

यावेळी दुकानमालकाने महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघीही एकमेकींशी कचाकच भांडत राहिल्या. काही वेळाने या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोघींनी एकमेकींच्या झिंज्या ओढल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया तसंच तुम्ही असं कधी भांडण केलं आहे किंवा पाहिलं आहे का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls fight in showroom it is said that the fight was for same dress video viral on social media srk