Girls Seen Playing Cricket On Mountain : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. बरेचदा ते मनोरंजक, मजेदार व्हिडीओ आणि स्टोरी शेअर करीत असतात. त्या माध्यमातून ते लोकांना आपल्याशी जोडून ठेवतात. त्यांचे काही व्हिडीओ खरोखर खूप प्रेरणादायी असतात; ज्यांचा लोकही आनंद घेतात. त्यांनी पुन्हा एकदा असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहताना तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.

तुम्ही अनेक लोकांना क्रिकेट खेळताना पाहिले असेल; ज्यावरून लोकांची खेळाबद्दलची आवड ओळखता येते. आता आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये मुली एका वेगळ्याच लेव्हलचे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, भारत क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे किंवा मी अनेक ‘स्तरा’पर्यंत घेऊन जात आहे, असे म्हणावे.

Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
mahakumbh mela 2025 fact check video
महाकुंभ मेळ्यातील रुग्णालयात भीषण आग, ८ जण जखमी? लोकांचे जीव वाचवण्यासाठी पोलिसांची धावाधाव; वाचा, Video मागचं सत्य काय?

ट्रकची हेडलाइट तुटल्याने खर्च वाचवण्यासाठी केला गजब जुगाड; मिठाईच्या बॉक्सचा असाही वापर, पाहा VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलींची एक टीम डोंगराळ भागात क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावेळी त्यांची क्रिकेट मॅच पाहण्यासाठी अनेक लोक तिथे बसलेले दिसतायत. बॅटिंग करणाऱ्या मुली अगदी धोनी स्टाईलने स्वॅगमध्ये बॅटिंग करीत चौकार व षटकार मारताना दिसत आहेत.

पुढे व्हिडीओमध्ये तुम्ही पहाल की, एक मुलगी फिल्डिंगसाठी टेकडीवर उभी आहे; जी हवेत फटकावलेला चेंडू पकडण्यासाठी वेगाने धावते. या क्रिकेटचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगराळ भागात जिथे चढणे-उतरणे अतिशय कष्टाचे आणि तितकेच धोकादायक असते, त्या जागी या मुली उत्तम प्रकारे फिल्डिंग करीत आनंदाने क्रिकेट खेळत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होत आहे. लोक या व्हिडीओचे खूप कौतुक करीत आहेत. एका युजरने लिहिले- क्रिकेट आमच्या रक्तात आहे सर. दुसर्‍याने लिहिले- हे थ्रीडी क्रिकेट आहे. तिसर्‍याने लिहिले- भारत हा सृजनशीलतेचा देश आहे आणि जेव्हा क्रिकेटचा विषय येतो…तेव्हा इथे क्रिकेटविषयीचे वेड आणि प्रेम वेगळ्याच पातळीवरील असते. चौथ्याने लिहिले- सर, खेळण्यासाठी मन लागते, जागा काय कुठेही मिळते; नाही तर मोबाईलच्या जमान्यात मैदान सुनसान पडले आहे!!

Story img Loader