Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून हसायला येतं तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटतं. ‘पापा की परी’ या टायटलवरून सोशल मीडियावर मुलींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच स्कुटी चालवणाऱ्या मुलींच्या एका अपघाताचा व्हिडीओ चर्चेत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तीन मुली एका स्कुटीसह नाल्यात पडल्या. त्यानंतर काही लोक नाल्यातून त्यांची स्कुटी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे मुली नाल्यात पडल्यामुळे गटाराच्या पाण्याने पूर्णपणे भिजलेल्या दिसत आहेत. त्या इतक्या भिजल्या आहेत की त्यांचा चेहरासुद्धा नीट दिसत नाही.
हेही वाचा : Optical Illusion : कुठे पाहतोय हा घोडा? तुमच्याकडे की सुर्याकडे? एकदा क्लिक करुन नीट पाहा
@Aanu__038 या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मुलींना टोमणा मारताना लिहिले आहे, “काय करावे, आम्ही तर नीट चालवत होतो, नालाच रस्त्यात आला” आणि व्हिडीओवर आणखी एक कॅप्शन लिहिली आहे, “पापा की परियाँ नाले में गिर पडियाँ”
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘ओह नो’ तर आणखी एक युजरने मिस्कीलपणे लिहिले, “खूप वाईट झाले.”
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वीही मुलींच्या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकदा मुलींना ‘पापा की परी’ या नावाने स्कुटी चालवण्यावरून सोशल मीडियावर ट्रोलही केले जातात.