जगातील अजब गजब विमानतळांची यादी तशी मोठी आहे. या यादीतून जर न्यूझीलँडच्या गिसबोर्न विमानतळाचे नाव वगळले तर ते चूकीचे ठरेल. या विमानतळाला अजब गजब म्हणण्याचे कारण असे की या विमानतळावरुन फक्त विमानच नाही तर दिवसातून ठराविक वेळी रेल्वे देखील जाते.
वाचा : ‘हा’ रस्ता दिवसातून दोनदा अदृश्य होतो
न्यूझीलँडचे गिसबोर्न विमानतळ हे जगातील अजब गजब विमानतळापैकी एक आहे. कारण या विमाळतळाच्या धावपट्टीवरून फक्त विमानच नाही तर कधी कधी रेल्वे देखील जाते. या विमानतळावर एकूण तीन रनवे आहे पण मुख्य रनवे वरूनच रेल्वे धावते. आता असा सर्व प्रकार असताना या विमानतळावरुन दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात. सकाळी ६.३० पासून हे विमानतळ सुरू होते. दिवसातून ठराविक वेळी या धावपट्टीचा वापर रेल्वेरुळासारखा होतो त्यामुळे विमानांना लँडिंग करताना मात्र थांबावे लागते.
VIDEO : काळजाचा ठोका चुकवणारी लँडींग
स्कॉटलँडच्या बारा बेटावर असेच काहीसे अजब गजब विमानतळ आहे. हे विमानतळ एका ठराविक वेळेला पाण्याखाली जाते त्यामुळे अशा विमानतळावर विमानाची लँडिग करणे म्हणजे वैमानिकांसाठी सगळ्यात कठीण काम आहे. विशेष म्हणजे समुद्रकिनारी असणारे हे जगातील एकमेव विमानतळ आहे. समुद्र किना-यावर विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ करण्यासाठी तीन रन वे बांधण्यात आले आहेत. पण जेव्हा समुद्राला भरती येते तेव्हा हे रन वे पूर्णपणे पाण्याखाली जातात. त्यामुळे भरती अहोटीच्या वेळा लक्षात घेऊनच येथे विमाने उतरवली जातात. दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे इतर वेळेला या विमानतळावर नागरिकही मुक्तपणे संचार करू शकतात. जगातील धोकादायक आणि अजब गजब विमानतळांमध्ये या विमानतळाचा समावेश आहे. ७ ऑगस्ट १९३६ मध्ये हे विमानतळ खुले करण्यात आले होते.
वाचा : जगातील सर्वात मोठा भुयारी रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला