लहान मुलं अत्यंत गोंडस असतात म्हणूनच लहान मुलांना देवाघरची फुल असे म्हटले जाते. मुलांचा निरागसपणा, मस्ती सर्वच काही आनंद देणारे असते. लहान मुलं नेहमी काही ना काही मजा-मस्ती करायला आवडते. आजकालची मुलं तर इतकी हुशार आहेत की त्यांना स्वत:बरोबर इतरांचे मनोरंजनही करता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही अनेकदा लहान मुलांना कॅमेऱ्यासमोर रिल व्हिडिओ शुट करताना किंवा फोटो काढताना पाहिले असेल. मुलांना मोबाइल कसा वापरावा किंवा फोटोसाठी पोज कशी द्यावे हे सांगावे लागत नाही सर्व काही ते आपोआप शिकतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका गोंडस चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चिमुकलीचे हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्कीच उमटेल.

चिमुकली देतेय फोटोसाठी पोज

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक चिमुकली आपल्या वडीलांच्या दुचाकीवर मागे बसली आहे तेही उलट्या दिशेला तोंड करून. अनेकदा लहान मुले मागून येणाऱी वाहने पाहण्यासाठी अशाप्रकारे उलट बसल्याचे आपण पाहतो. पण ही चिमुकली मात्र मागून येणाऱ्या वाहनचालकांचे मनोरंजनही करत आहे. चिमुकली मागून येणाऱ्या गाडीची लाईट पाहून एकापाठोपाठ एक फोटोसाठीच्या पोज देत आहे. मागून येणाऱ्या वाहनचालकाने तिचा हा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कारण तिचा हा गोंडसपणा अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन येत आहे.

हेही वाचा – लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकला वादक सज्ज! छोटासा ढोल कंबेरला बांधून करतोय वादन, पाहा Video Viral

हेही वाचा – Video :”फास्टफूडसमोर चटणी भाकरी ठरली सरस!”, ७५ वर्षाच्या आजी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पटकावला तृतीय क्रमांक

गोंडस व्हिडीओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

इंस्टाग्रामवर lokesh_naidu_46′ पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमवर अनेकांनी कमेंट करून चिमुकलीचे कौतूक केले आहे.

हेही वाचा – मुंबईतील डेटिंग घोटाळा उघड! पुरुषांना भेटण्यास बोलावून घातला हजारो रुपयांना गंडा; काय आहे नेमकं प्रकरण?

एकाने लिहिले की,”ती सुंदर फोटोसाठी पोज देत आहे. सर्वांचा दिवस सुंदर बनवण्यासाठी धन्यवाद” दुसरा म्हणाला, “सर्वात सुंदर व्हिडीओ” तिसरा म्हणाला, प्रत्येकजण मुलीच्या हास्याचे कौतूक करत आहे पण मला तिच्या हिंमतीचे कौतूक वाटते”
चौथा म्हणाला, “बालपण एक वेगळी गोष्ट आहे, यावरून मला माझ्या बालपणीची आठवण झाली”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giving amazing poses for photos cute little girl are having fun sitting behind her dads bike video will bring a smile on your face snk