सध्या नोएडातील गार्डन गॅलेरिया मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक बारमध्ये दारूची पार्टी करत असताना, अनाचक रामानंद सागर यांनी बनवलेल्या रामायणातील काही दृश्ये स्क्रीनवर सुरु झाल्याचं दिसत आहे. समोर रामायणातील दृश्य आणि लोकांच्या हातात दारुचे ग्लास दिसत आहेत. त्यामुळे आता व्हिडीओवरुन नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. कारण अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी बारमधील डीजे ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्याती मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये भगवान राम आणि रावण यांच्यातील रणांगणामधील संवादाचे दृश्य सुरू असल्याचं दिसत आहे. तर याचवेळी बारमध्ये उपस्थित लोक दारूचे ग्लास घेऊन गोंधळ घालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच नोएडा पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-३९ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पाहा- २१ वर्षांचे असताना प्रभू रामचंद्र कसे दिसत असतील? जाणून घेण्यासाठी पाहा AI द्वारे निर्मित Digital Photo

हिंदू संघटनांनी केली तक्रार –

व्हिडीओ व्हायरल होताच, अनेक हिंदू संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, बारमधील डीजे ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात बारमध्ये काम करणाऱ्या लोकांनी सांगितले की, पार्टीदरम्यान चुकून रामायणातील व्हिडीओ सुरु झाला होता, त्याचा कोणीतरी व्हिडिओ बनवला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल –

हेही पाहा- “लज्जास्पद…” संपत्तीसाठी वकीलाने वृद्ध महिलेच्या मृतदेहालाही सोडलं नाही; कारमधील ‘तो’ Video पाहून नेटकरी संतापले

या प्रकरणावर अतिरिक्त डीसीपी नोएडा, शक्ती अवस्थी यांनी सांगितलं की, या घटनेचा व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो गार्डन गॅलेरिया मॉलच्या लॉर्ड्स ऑफ ड्रिंक्स बारमधील असल्याचं सांगितले जात आहे. तर व्हिडिओमध्ये रामायण मालिकेतील काही पात्रांतील संवाद सुरु असल्याचं दिसत आहे. या प्रकरणाची दखल घेत सेक्टर ३९ च्या पोलिसांनी तत्काळ एफआयआर नोंदवला अशून कलम 153A आणि 295A अंतर्गत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गार्डन गॅलेरिया मॉल सतत असतो वादात –

नोएडातील सेक्टर-३९ भागात असलेल्या गार्डन गॅलेरिया मॉलला वादाची पार्श्वभूमी आहे. २०२२ एप्रिलमध्ये ७हजार ४०० रुपयांच्या बिलावरून कंपनीच्या ७ कर्मचाऱ्यांमध्ये भांडण झाले होते. यावेळी बारचे कर्मचारी आणि बाऊन्सर्संनी एका तरुणाला जबर मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glass of liquor in hand ramayana on screen video viral on social media from a bar in noida jap
Show comments