Glen Maxwell Touch Sachin Tendulkar Feet: २०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद २०१ धावांची खेळी पूर्ण करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची जगभरात चर्चा आहे. शतक पूर्ण केल्यानंतर मॅक्सवेलच्या पायात आलेल्या क्रॅम्पमुळे अजिबात हालचाल करता येत नव्हती. त्याची अवस्था पाहून त्याच्या जागी खेळायला येण्यासाठी ऍडम झाम्पाने तयारी सुद्धा केली होती. पण त्यानंतर त्याने केलेली कमाल क्रिकेटच्या इतिहासात नोंदवली गेली आहे. मात्र त्याच्या या शानदार खेळीनंतर त्याचा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. मॅक्‍सवेल तेंडुलकरच्या पाया पडत असल्याचा हा फोटो सध्या चर्चेत आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Dr. P V Venkitakrishnan ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
donald trump who is Vivek Ramaswamy
ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळालेले अब्जाधीश विवेक रामास्वामी कोण आहेत? त्यांचे भारताशी काय नाते? वाचा सविस्तर
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

इतर वापरकर्ते देखील हेच चित्र शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही फोटो डाउनलोड करून आणि त्याचे बारकाईने निरीक्षण करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला असे आढळले की प्रतिमेच्या उजव्या बाजूला हँडशेक स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल सचिन तेंडुलकरच्या पाया पडत असल्याची बातमी आली आहे का ते आम्ही तपासले. आम्हाला असे कोणतेही विश्वासार्ह मीडिया अहवाल किंवा मोठ्या प्रमाणावर प्रसारित केलेले चित्र देखील आढळले नाही.

‘मॅक्सवेल सचिन तेंडुलकर भेट’ असे कीवर्डस वापरून आम्ही शोध घेतला असता आम्हाला एक बातमी आढळली ज्यामध्ये तेंडुलकरने मुंबईत अफगाणिस्तान संघाची भेट घेतली होती याचा अहवाल आढळून आला.

https://www.espncricinfo.com/cricket-videos/icc-cricket-world-cup-2023-sachin-tendulkar-meets-the-afghanistan-team-in-mumbai-1407661

सचिन तेंडुलकरने या बातमीतील व्हिडिओमध्ये घातलेला टीशर्ट हा व्हायरल चित्रात दिसत असल्याप्रमाणेच आहे. हे ट्विट आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले आहे.

https://x.com/ICC/status/1721521725177815267

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात आम्हाला सचिन तेंडुलकरचा मूळ फोटो सापडला.

https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/sachin-tendulkar-gives-pep-talk-to-afghanistan-team/articleshow/105016706.cms?from=mdr

याचे श्रेय गेटी इमेजेस ला देण्यात आले. आम्हाला मूळ फोटो स्टॉक फोटो वेबसाइटवर देखील आढळला.

https://www.gettyimages.co.uk/detail/news-photo/former-indian-cricketer-sachin-tendulkar-speaks-to-members-news-photo/1778130132

इंटरनेटवर ग्लेन मॅक्सवेलचे अनेक फोटो उपलब्ध होते. असाच एक फोटो व्हायरल होण्यासाठी वापरण्यात आला होता, जिथे तो सचिन तेंडुलकरच्या पायाला स्पर्श करत असल्याचे दिसत आहे.

निष्कर्ष: ग्लेन मॅक्सवेल सचिन तेंडुलकरच्या पाया पडला नाही. व्हायरल फोटो एडिट केलेले आहे, व्हायरल दावा खोटा आहे.