Goa Boat Accident Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले; ज्यामध्ये शेकडो प्रवाशांनी भरलेली बोट बघता बघता खोल समुदात बुडल्याचे दिसतेय. या दुर्घटनेत २३ लोकांचा मृत्यू झाला; तर ४० जणांना वाचविण्यात यश आले आहे आणि ६४ बेपत्ता आहेत, असा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ गोव्यातील असल्याचा दावा नेटकरी करीत आहेत. पण, खरंच हा व्हिडीओ गोव्यातील आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं आणि ते नेमकं काय होतं ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युजर श्री कृष्णा पॉल यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

या पोस्टचा अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://web.archive.org/web/20241007054358/https://twitter.com/skrishna1969/status/1842774011173843426

इतर युजर्सदेखील अशीच पोस्ट शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि स्क्रीनग्रॅब मिळवून तपास सुरू केला. आम्ही या व्हिडीओमधील स्क्रीनवर रिव्हर्स इमेज सर्च चालवलं.

यावेळी आम्हाला TRTHABER च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील सापडली.

Tata Companies List : मिठापासून विमानापर्यंत, ‘या’ कंपन्या आहेत टाटा समूहाच्या मालकीच्या

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

“दु:ख ही प्रेमाची किंमत, अलविदा…”; टाटांच्या निधनानंतर त्यांच्या ३० वर्षीय मित्राची भावनिक POST

आम्हाला हाच व्हिडीओ YouTube वर देखील सापडला. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला इतर YouTube अकाउंटवरदेखील व्हिडीओ सापडला.

अनेक न्यूज चॅनेल्सच्या यूट्यूब चॅनेलनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आम्हाला न्यूज चॅनेल्सच्या अनेक वेबसाइटवर या दु:खद अपघाताच्या बातम्यादेखील आढळल्या.

https://www.reuters.com/world/africa/around-23-bodies-recovered-following-boat-accident-congos-lake-kivu-2024-10-03/
https://www.npr.org/2024/10/04/g-s1-26276/boat-capsizes-eastern-congo
https://www.newsonair.gov.in/87-dead-as-overcrowded-boat-capsizes-in-congos-lake-kivu/

रिपोर्टमध्ये म्हटले आहे : गोमा, काँगो – पूर्व काँगोमधील किवू समुद्रात गुरुवारी प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट उलटल्याने किमान ७८ पर्यटकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक गव्हर्नर यांनी सांगितले. काही तासांनंतर शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. कारण- बोट उलटताच अनेक जण जण बेपत्ता झाल्याचे समोर आले. या घटनेच्या वेळी बोटीतून २७८ लोक प्रवास करीत होते, असे सांगितले जाते.

तपासादरम्यान आम्हाला X वर गोवा पोलिस हॅण्डलची पोस्टदेखील सापडली.

हा दावा खोटा असल्याचे गोवा पोलिसांच्या एक्स हॅण्डलवरून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – खांबावर लटकलेल्या अजगराने हवेत कावळ्यावर घातली झडप; जबड्यात मुंडक पकडलं अन्…; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

निष्कर्ष :

गोव्यात बोट उलटल्याचा व्हायरल व्हिडीओ प्रत्यक्षात डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या किवू समुद्रातील आहे. त्यामुळे ही घटना गोव्यातील सांगून खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केले जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa boat accident fact check viral video of boat accident is from congo not goa sjr