कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ च्या फुटबॉल स्पर्धेत एकाहून एक रंगतदार सामने होत आहेत. जगभरातून लाखोंच्या संख्येत फुटबॉल प्रेमी फिफा विश्वचषकाचा आनंद लुटत आहेत. मैदानात प्रत्यक्षात हजर राहून फिफा विश्वचषक पाहण्याचा उत्साहच काहीसा वेगळा असतो. पण सर्वांनाच फिफाचे सामने पाहायला जाणं शक्य होतंच असं नाही. प्राण्यांचा फुटबॉलचे सामने पाहण्याचा काहीच संबंध येत नाही. मात्र, त्यांनाही फुटबॉल खेळायला नक्कीच आवडंत असेल, होय हे सत्य आहे. कारण एका बकऱ्याला फुटबॉल खेळण्याचा मोह आवरला नसल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. ‘किक नही तो हेडही सही’ अशा अंदाजात बकरा रस्त्यावर फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न करतो. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा : ‘योग्य संधी मिळण्यासाठी संजू सॅमसनने धीर धरावा’, प्रशिक्षक म्हणाले, ” सूर्यकुमार यादवलाही….”

एकीकडे कतारमध्ये फिफा विश्वचषकाचे धमाकेदार सामने होत असतानाच सोशल मीडियावर एका बकऱ्याच्या फुटबॉल खेळण्याच्या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. माणसांच्या पलीकडे आता प्राण्यांनाही फुटबॉल खेळण्याची प्रचंड आवड असल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. एका व्यक्तीसोबत बकरा जबरदस्त हेड पोजिशनमध्ये फुटबॉल खेळत असल्याचं व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. बकरा ज्या स्टाईलने फुटबॉल खेळतो हे पाहून फुटबॉल चाहतेही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. या बकऱ्याने फुटबॉल खेळण्याची अप्रतिम शैली दर्शवत फुटबॉल प्रेमींची मनं जिंकली आहेत, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ काही सेकंदांचाच आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही फुटबॉल लव्हर बकऱ्याचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक फुटबॉल प्रेमी त्याच्या घराजवळ बकऱ्यासोबत फुटबॉल खेळत असतो. त्या व्यक्तीनं चेंडू हवेत उडवल्यानंतर बकऱ्याने जे काही केलं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हवेत उडवलेल्या चेंडूवर बकऱ्या जबरदस्त हेड पोजिशनने खेळ सादर करतो. त्याची ही शैली पाहून फुटबॉल प्रेमींच्याही भुवया उंचावल्या आहेत.

नक्की वाचा – वाह रे पठ्ठ्या! डोकं धुण्यासाठी खरं ‘डोकं’ लावलंस, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ही तर ‘5G Technology’

इथे पाहा व्हिडीओ

बकऱ्याच्या या मजेशीर व्हिडीओला सोशल मीडियाचं माध्यम ट्विटरवर @viralPosts5 नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत युजरने कॅप्शन मध्ये म्हटलं, ओह तेरी, हा बकरा किती जबरदस्त खेळतो. १४ सेकंदांच्या या व्हिडीओला पाहण्यासाठी लोकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १५ हजार व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो जणांनी लाईक केलं आहे. तसंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, अजबच, भाई याला तर फिफालाच पाठवा. दुसऱ्याने म्हटलं, यासाठीच त्याला GOAT (Greatest of all Time) म्हटलं जातं.