देशभरात बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक मुस्लिम बांधव हा सण साजरा करण्यात व्यस्त आहेत. अशात सध्या सोशल मीडियावर एका बकरीची जोरदार चर्चा सुरु आहे. जिच्याबद्दल ऐकून तुम्हालाही हसू येईल. ही बकरी बिहारमधील भागलपूर येथील एका मुस्लिम बांधवाची असून त्याचे नाव शाहिद उर्फ भोला असे आहे.

शाहिद त्यांच्या बकरीमुळे सध्या पंचक्रोशीत प्रकाश झोतात आले आहेत. त्यांच्याकडे आता तोतापुरी जातीची एक बकरी आहे, जिचे नाव त्यांनी लॉकडाऊन असे ठेवले आहे. बकरीचे हे नाव ऐकून आता अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. लॉकडाऊन नावाच्या या बकरीला थंड पाणी प्यायला आवडते. याशिवाय ही तिच्या छंदासाठी देखील ओळखली जाते. ती मालकासोबत बसून नेहमी थंड पाणी आणि थंड पेय पिण्याचा आनंद घेते. यामुळे बकरी ईदच्या सणात आता ही बकरी चांगलीच चर्चेत आली आहे.

चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने शेजाऱ्यांनी गाडीवर चिकटवली अशी नोटीस; युजर्स पाहून म्हणाले, चांगले शेजारी…

२०२० मध्ये झाला होता जन्म

या बकरीच्या नाव मागची खासियत म्हणजे २०२० मध्ये तिचा जन्म झाला, आणि याच काळात देशात कोरोना महामारीने थैमान घातल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळेच मालकाने तिचे नाव लॉकडाऊन असे ठेवले. या बकरीला विकत घेण्यासाठी आता १ लाख रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली आहे. पण त्या मालकाला ती विकायची नसून त्याला स्वत:च्या घरात तिची कुर्बानी द्यायची आहे. या बकरीला दररोज १०० रुपये खर्च होतो. सध्या तिचे वजन ८० किलो इतके आहे.

Story img Loader