Gobi Manchurian Banned in Goa: भारतात अनेकांना कोबी मंच्युरिअन खायला आवडते. पण, सध्या कोबी मंच्युरिअन बनवताना सिंथेटिक रंगांचा वापर आणि अस्वच्छतेच्या कारणांमुळे गोव्यात बंदी घालण्यात आली आहे. पण, हा पदार्थ नक्की चायनीज आहे की भारतीय असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग, कोबी मंच्युरिअनचा इतिहास जाणून घेऊया..

भारतातील शहरांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांची लोकप्रियता कमी होत असून भारतीय-चायनीज खाद्यपदार्थांची लोकप्रियता वाढत आहे. प्रत्येक चौकात, रस्त्याच्या कडेला चायनीज स्टॉल लागलेले दिसतात. अशा स्टॉलवर चायनीज खाद्यपदार्थ भारतीय लोकांना आवडेल अशा स्वरूपात तयार केले जातात. लोकांना त्याची चवही आवडते आणि काहीतरी वेगळे खायला मिळते. कोबी मंच्युरिअनदेखील अशाच पद्धतीने तयार झालेला एक पदार्थ आहे.

Syria,lebanon Israel,pagers pager blast
विश्लेषण : लेबनॉन पेजर स्फोटांमागे इस्रायल? पॅकिंगच्या वेळीच पेजरमध्ये स्फोटके पेरली?
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
green concept develop application
झाडांच्या कार्बनशोषक क्षमतेची मोजणी आता शक्य; पुण्यातील नवउद्यमीकडून उपयोजन विकसित, ‘नेट झीरो’ उद्दिष्ट गाठण्यास साह्यभूत
136 artificial ponds for immersion build in navi mumbai
नवी मुंबईत यंदा १३६ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती; जलप्रदूषण टाळण्याचे आयुक्तांचे आवाहन
navi Mumbai potholes repairing works
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा

भारत आणि चीन या दोन्ही देशांतील खाद्यसंस्कृतीच्या मिश्रणातून हा पदार्थ तयार झाला आहे. भारतीय लोकांना मसालेदार पदार्थ आवडतात, तर चिनी लोकांना सोया सॉस आणि व्हिनेगरसारखे मसाले टाकून तयार केलेले पदार्थ खायला आवडतात. या दोन्ही पद्धतींचे मिश्रण कोबी मंच्युरिअनच्या पाककृतीमध्ये दिसते. फुलकोबीचे तुकडे कॉर्नफ्लोरच्या पीठात बुडवून तळले जातात आणि त्यानंतर तिखट टाकून आणि सोया सॉस आणि व्हिनेगर टाकून परतले जातात. कोबी मंच्युरिअनमध्ये भारतीय आणि चायनीज दोन्ही चवींचा आस्वाद घेता येतो, त्यामुळेच या पदार्थाला अल्पावधीत भरपूर लोकप्रियता मिळाली आहे.

हेही वाचा – Video: “खुब भालो!” स्पोर्ट बाईक चालवताना दिसली बंगाली नवरी; Viral Video पाहून नेटकरी झाले फिदा

आशियाई रेस्टॉरंट पुरस्कार या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, “कोबी मंच्युरिअनचा उगम भारतातील रस्त्यावरील स्टॉल्सवर झाला आहे. १९७०च्या दशकात कोलकाता येथे जन्मलेल्या चायनीज वंशाचा नेल्सन वांग हा रेस्टॉरंट क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये स्वयंपाक करत असे. जेव्हा एका ग्राहकाने मेनूमध्ये जे काही दिले जात होते त्यापेक्षा वेगळ्या पदार्थाची विनंती केली, तेव्हा चिकन मंच्युरिअनचा जन्म झाला. या तरुण शेफने चिकनचे तुकडे कॉर्नफ्लोअरच्या पीठात बूडवले आणि तळले. त्यानंतर त्याने चिकनचे तुकडे एका तपकिरी ग्रेव्हीमध्ये टाकले ज्यात कांदे, आले, लसूण आणि हिरव्या मिरचीसह व्हिनेगर, सोया सॉस आणि कॉर्न-स्टार्च एकत्र केले होते. एका दशकापेक्षा कमी कालावधीत, चिकन मंच्युरियन भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ म्हणून उदयाला आले. लोकांना हा पदार्थ खूप आवडला. लवकरच मंच्युरियन हा शब्द कोबी (फुलकोबी) आणि पनीरलासह जोडला गेला. टोमॅटो, कोथिंबीर आणि अगदी गरम मसाल्यांनी मंच्युरियन सॉसने त्याची चव वाढवली.

हेही वाचा – नवरा रोज ब्रश अन् अंघोळ करत नाही म्हणून महिलेने मागितला घटस्फोट! कोर्टाने सुनावला निर्णय

जेव्हा वांगने मुंबईत चायना गार्डन हे रेस्टॉरंट उघडले होते तेव्हा चिकन मंच्युरिअनला पसंती मिळत होती. पण, जेव्हा लोक शाकाहारी मंच्युरिअनची मागणी करू लागले तेव्हा पदार्थामध्ये फुलकोबीचा समावेश झाला. बारीक केलेले कांदे आणि लालसर-तपकिरी सॉस हे कोबी मंच्युरिअनचे वैशिष्ट्य आहे. जे नूडल्स किंवा फ्राईड राईस किंवा सूपसह खाल्ले जाऊ शकते.

वांग व्यतिरिक्त इतर स्थलांतरित चिनीदेखील कोलकाता येथे स्थायिक झाले आणि हे शहर भारतीय-चिनी समुदायाचे केंद्र बनले. हा समुदाय आज लहान आहे, पण त्याचा वारसा त्याच्या पाककृतीच्या रूपाने अजूनही अस्तित्वात आहे. भारतातील बहुतेक चायनीज रेस्टॉरंट्समध्ये फक्त भारतीय-चायनीज खाद्यपदार्थ असतातच, पण आता इतर देशांमध्येही हे पदार्थ विकले जातात.