Gold Chain Robbery Video : चोरी, लूटमारीच्या गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधत असतात. चोरीच्या काही घटना ऐकून तर हैराण व्हायला होते. सोशल मीडियावर सध्या चोरीच्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात भररस्त्यात दोन चोर एका व्यक्तीच्या गळ्यातील चेन सहजपणे चोरताना दिसतायत. चोरीची ही घटना पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

गळ्यातील चेन हिसकावून काढला पळ

ही घटना उत्तर प्रदेशातील नोएडामधील असल्याचे सांगितले जातेय. नोएडाच्या सेक्टर २४ परिसरातील एका स्टँडर्ड स्वीट्स दुकानाबाहेर मोमोज खाणाऱ्या एका व्यक्तीला दोन चोरांनी लक्ष्य केले, घटनेच्या वेळी चोरांंनी प्रथम त्या व्यक्तीच्या मागे येऊन दुचाकी थांबवली. त्यानंतर एक जण दुचाकीवरून खाली उतरला आणि ती व्यक्ती कितपत सावध आहे याचा अंदाज घेऊ लागला. नंतर त्या व्यक्तीचे लक्ष आपल्याकडे नसून, दुसरीकडे असल्याचे लक्षात येताच त्याने संधी साधून, त्याच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. त्या व्यक्तीने बाईकस्वाराचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्याला यश मिळाले नाही.

कुटुंबासह मोमोज खाण्यासाठी गेली असताना घडली घटना

ही घटना १९ मार्च १०२५ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. ही संपूर्ण घटना दुकानाबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित व्यक्ती कुटुंबासह मोमोज खाण्यासाठी गेली असताना त्याच्याबरोबर ही घटना घडली.

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, किती छान चोर आहेत, आधी त्यांनी मोमोज खायला दिले. नंतर टेन्शन दिले. दुसऱ्याने लिहिले की, अशा चोरांना भरचौकात चाबकाने फोडले पाहिजे. तिसऱ्याने लिहिले की, लोक किती मेहतन घेऊन पैसा कमावतात आणि त्यांनी कष्टाने घेतलेल्या वस्तू असे लोक हिसकावून घेतात.

Story img Loader