Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशाच चौरट्यांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांचे दागीणे आणि रोख रक्कम लंपास केलीय.चोर अनेकदा ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर नजर ठेऊन असतात, आणि संधी मिळाली की हात साफ करुन घेतात. अशाच एका चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर होतोय.
उत्तर प्रदेशमधील एका भागात ज्वेलरीच्या दुकानात दिवसा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पाच जण दुपारच्या वेळी अचानक दुकानात घुसतात, आणि बंदुकीचा धाक दाखवत सोनं लुटण्याचा प्रयत्न करतात. मुखवटा घातलेल्या बदमाशांनी भरदिवसा एका ज्वेलरी स्टोअरमध्ये घुसून दुकानात लूटमार केली. दरोडेखोरांनी दागिने व्यापारी व त्यांच्या मुलाला बंदुकीचा धाक दाखव तिजोरीत ठेवलेले कोट्यवधींचे दागिने घेऊन फरार झाले आहेत. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे दुकान सुलतानपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थाथेरी बाजार येथे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही हल्लेखोरांनी हेल्मेटने तोंड झाकले आहे तर काहींनी कपड्याने तोंड झाकल्याचे दिसत आहे. ही घटना घडली तेव्हा दुकानात आणखी दोन लोकही उपस्थित होते. त्यांनाही धाक दाखवत चोरांनी शांत केले. व्हिडिओमध्ये भरतचा मुलगा अतुल दरोडेखोरांसमोर हात जोडून बसलेला दिसत आहे. दरोडेखोरांनी दागिन्यांनी बॅग भरली आणि दुकानातून पळ काढला. ते सर्वजण सोबत शस्त्रे घेऊन गेले होते आणि सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरोड्यात सहभागी असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी सहा पथकेही तयार केली आहेत. ते सीसीटीव्ही फुटेज तपासून दरोड्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्वेलर्सच्या दुकानात वरचेवर चोरीच्या घटना घडत असतात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं चोरी करण्याचा प्रयत्न चोर करतात.हा व्हिडीओ @gharkekalesh या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत
© IE Online Media Services (P) Ltd