Old Gold Bill 1959:: लग्नसराई, दसरा, दिवाळी, अक्षय तृतीया, बारसा, वाढदिवस अशा अनेक शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते. काही लोकांना तर सोन्याची इतकी आवड असते की, ते वर्षानुवर्षे काही ना काही सोने खरेदी करतात. सोन्याच्या दरात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली असली तरी लोकांमधील खरेदीचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. प्रत्येक सणाला सोनाराच्या दुकानातील गर्दीवरून आपल्याला लक्षात येईल की, लोकांमध्ये सोनेखरेदीचा उत्साह किती आहे. बरेच लोक तर असे असतात की, त्यांच्याकडे कितीही सोने असले तरी त्याने त्यांचे समाधान होत नाही आणि म्हणून ते सातत्याने सोन्याचा दर पाहून काही ना काही सोन्याची वस्तू खरेदी करून ठेवत असतात.

सोन्याची इतकी कमी किंमत पाहून युजर्स अवाक् (gold bill from 1959)

जर अशा लोकांना कोणी सांगितले की, एक काळ असा होता जेव्हा ११.६ ग्रॅम सोने फक्त ११३ रुपयांना मिळत होते, तर कदाचित त्यांना धक्का बसेल. मात्र, ज्या काळात सोन्याचा भाव इतका कमी होता, त्या काळात लोकांचे आर्थिक उत्पन्नही सध्याच्या काळाच्या तुलनेत खूपच मर्यादित होते. सध्या सोशल मीडियावर आपल्या आजी-आजोबांच्या काळातील सोनेखरेदीच्या एका बिलाचा जुना फोटो व्हायरल होतोय; जो पाहिल्यानंतर अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
pune gold jewellery stolen loksatta news
पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी
Error in gold import data due to double counting government clarification
दुहेरी मोजणीमुळे सोने आयातीच्या आकडेवारीत चूक – सरकारची स्पष्टोक्ती

आत्ताचे ७५ हजारांच सोनं त्याकाळी होते फक्त ११३ रुपये

सोनेखरेदीच्या खूप जुन्या बिलाच्या व्हायरल होत असलेल्या फोटोनुसार, ११.६६ ग्रॅम सोन्याची किंमत केवळ ११३ रुपये आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार, व्हायरल झालेले बिल १९५९ सालचे आहे, जेव्हा ११.६६ ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ११३ रुपये होती. पोस्टात याच सोन्याची सध्याची किंमत ७० ते ७५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोन्याच्या फक्त ११३ रुपयांच्या बिलाचा फोटो इन्स्टाग्रामवर zindagi.gulzar.h नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जुन्या काळातील सोन्याची इतकी कमी असलेली किंमत पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोवर आता युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Read More Trending News : ११ रुपयांत मिठी, ११५ रुपयांमध्ये चुंबन अन्…; ‘स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस’ ट्रेंड नेमका काय आहे? घ्या जाणून….

या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, वेळ वेगाने पुढे जात आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, “त्यावेळी लोकांच्या उत्पन्नानुसार, ते महागच होते. कारण- तेव्हा लोकांचे पगार खूप कमी होते.” तिसऱ्या युजरने लिहिले, “त्यावेळी लोकांचा पगार ४० रुपये दरमहा असायचा.”

Story img Loader