Gold Price Today: दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या. लक्ष्मीपूजनाच्या मुर्हुतावर सोन्याचे दर दिवसांदिवस दर वाढतानाचे चित्र दिसत आहे. दिवाळी म्हटली की सोन्याचे लोक आर्वजून सोन्याचे दागिने खरेदी करतात म्हणून सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलेले पाहायला मिळतात. मात्र, जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजही सोन्याची किंमत वाढली आहे. अशातच आता गुगलवरही आजचे सोन्याचे दर ट्रेंडींगवर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सणासुदीत सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. दिवाळीत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता सोन्याच्या चमकेची झळ बसणार आहे. मागील काही दिवस सोन्याचा भाव विक्रमी उच्चांक गाठतोय त्यामुळे सणासुदीला सर्वसामान्यांचे खिशे रिकामे होणार आहे. आज भारतात १० ग्रॅम सोन्याची किंमत २४ कॅरेटसाठी ८१ हजाराच्या आसपास आहे तर २२ कॅरेट सोन्यासाठी ७३ हजार ८०० रुपये आहे.

मुंबईत आज सोन्याचा काय भाव ?

मुंबईत आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर ७४,५६० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचा दर ८१,३४० रुपये आहे.

आदल्या दिवशीचा म्हणजे ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,८४० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९७,३६० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर सातत्याने कसे चढ- उतार होत आहेत.

गुगलवर ट्रेंड होत आहे गोल्ड रेट

वरील चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, गुगलवर गोल्ड रेट हा किवर्ड ट्रेंड होत आहे. २०० पेक्षा अधिक या किवर्डला सर्च करण्यात आलं आहे. त्यामुळे गुगल रेट हा किवर्ड सध्या ट्रेंडींगला आहे.

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर
२४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई७४,५६० रुपये८१,३४० रुपये
ठाणे७३,८५० रुपये८०,५६० रुपये
पुणे७३,८५० रुपये८०,५६० रुपये
नागपूर७३,८५० रुपये८०,५६० रुपये

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यात काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते, तर २२ कॅरेट सोने सुमारे ९१% शुद्ध असते. २२ कॅरेट सोन्यामध्ये ९% इतर धातू, जसे की तांबे, चांदी आणि जस्त मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने अत्यंत शुद्ध असते, परंतु त्याचे दागिने तयार करता येत नाहीत, कारण ते मऊ असते. त्यामुळे बहुतांश सराफ दुकानांमध्ये २२ कॅरेट सोन्याचेच दागिने विकले जातात, कारण ते अधिक टिकाऊ असतात आणि दागिने बनवण्यासाठी योग्य असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price today gold in mumbai check latest gold and silver prices on 1 november 2024 mumbai pune nagpur gold price silver price on 1 november 2024 google trends srk