Shocking video: पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? तिखट-आंबट-गोड पाणी आणि रगडा असं कॉम्बिनेशन असलेली ही पाणीपुरी दिसताच अनेकांच्या तोंडालाच पाणी सुटतं. जेव्हा कधी जिभेचे चोचले पुरवावेसे वाटले, किंवा काही चमचमीत खावेसे वाटते तेव्हा डोळ्यासमोर पहिले नाव येते ते पाणीपुरीचे. कोणीही असो पाणीपुरीचे नाव जरी काढले की तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी देशात विविध नावांनी ओळखली जाणारी ही पाणीपुरी तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळते. स्वच्छतेच्या कारणास्तव बाजारात मिळणारी पाणीपुरी अनेकदा खाण्याचे टाळली जाते. याआधीही अनेकदा पाणीपुरीच्या अस्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत, अशातच आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडतं का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकीच किळस आणणारा प्रकार घडला आहे. झारखंडमधील गढवा येथे पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले जात होते. एवढंच नाहीतर चव वाढवण्यासाठी टॉयलेट क्लीनर हार्पिक आणि युरियाचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एका घरात हे कामगार काम करत आहेत. यावेळी व्हिडीओ काढणारी व्यक्ती त्यांच्याशी बोलत आहे. अस्वच्छ असणाऱ्या या जागेत सुरु असलेला हा प्रकार पाहून यापुढे पाणीपुरी खाताना अनेकजण नक्की विचार करतील.

हा व्हिडिओ निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही घटना माझियानबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे दोन दुकानदार पाणीपुरी बनवण्यासाठी पायाने पीठ मळत होते. चौकशीदरम्यान, दोन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितले की, ते पाणीपुरीची चव वाढवण्यासाठी हार्पिक आणि युरिया खतांचा वापर करत होते.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/dhananjaynews/status/1846745369235141010

हेही वाचा >> “भावा नोकरी दुसरी मिळेल पण आयुष्य…” तरुणाचा १२ व्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न; एक पाऊल पुढे टाकलं अन्..थरारक VIDEO पाहाच

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र समोर आलेला हा प्रकार खरंच भयंकर आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Golgappa vendors arrested for kneading dough with feet mixing harpic for taste shocking video goes viral on social media srk