EPFO आणि ESIC दोन्ही कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत त्यांच्या ग्राहकांना पीएफ आणि आरोग्य विमा सारख्या सुविधा पुरवतात. जेथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती संरक्षित करण्यासाठी तरतूद निधी जमा करते. त्याचबरोबर २५ हजार रुपयांपर्यंत मासिक पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसीच्या माध्यमातून आरोग्य विम्याची सुविधा मिळते. ज्यामध्ये ईएसआयसी कार्डधारक देशभरातील ईएसआय रुग्णालयामध्ये उपचार घेऊ शकतात. याशिवाय, ईपीएफओ आणि ईएसआयसीने देखील त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरू केल्या आहेत. ज्याचा तुम्हीही फायदा घेऊ शकता.
ESIC कार्डधारकांना मिळणार ही सुविधा –
आतापर्यंत ईएसआयसी कार्डधारकांना ईएसआयसी रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळत होते. परंतु ईएसआयसीच्या पुढाकारानंतर आता विमाधारक ईएसआय लॅबमध्ये जाऊन सीटी स्कॅन करू शकतो. एमआरआय, इकोकार्डियोग्राफी यांसारख्या किचकट चाचण्याही मोफत करून घेऊ शकणार आहेत. यासाठी तुम्हाला तुमचे ईएसआयसी कार्ड दाखवावे लागेल. यासोबतच तुम्हाला यासंबंधी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही ईएसआयसी च्या esic.nic.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.
EPFO सदस्यांना मिळणार ही सुविधा –
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ते आता डिजिलॉकरवरून यूएएन कार्ड ऍक्सेस करू शकतात. ईपीएफओने म्हटले आहे की आता पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सरकारच्या ई-लॉकर सेवा डिजीलॉकरवर उपलब्ध असेल. ईपीएफओने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ईपीएफओ सदस्य आता डिजीलॉकरद्वारे त्यांचे यूएएन, पीपीओ डाउनलोड करू शकतात.
डिजिलॉकर म्हणजे काय? –
‘डिजिटल लॉकर’मध्ये (डिजीलॉकर) हे एक प्रकारचे आभासी लॉकर आहे, जे जुलै २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केले होते. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत डिजीलॉकर लाँच करण्यात आले होते. डिजीलॉकर खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. डिजीलॉकरमध्ये, देशातील नागरिक कोणतेही सरकारी प्रमाणपत्र जसे की पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादीसह प्रमाणपत्र जतन करून ठेवू शकतात.
‘डिजी लॉकर’ ही क्लाऊड तंत्रज्ञानावर काम करते. नागरिकांना आपल्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्यांची ‘सॉफ्ट कॉपी’ आपल्या ‘डिजी लॉकर’ खात्यात जमा करून ठेवता येते. आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा आपण त्या फाइलची प्रिंटआऊट काढू शकतो.