माणुसकी म्हणजे काय हो? असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण काही त्याची वेगळी व्याख्या सांगेल. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर निस्वार्थ भाव मनात ठेवून केलेली मदत म्हणजे माणूसकी! आजच्या काळात ही माणूसकी हरवत चालली आहे. अनेकदा संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. अशा अनेक घटना समोर येत असतात जिथे माणुसकीच्या नात्यानेही कोणी दुसऱ्याची मदत करत नाही. पण अजूनही काही मोजकेच लोक असतात जे माणूसकी जिवंत ठेवतात. संकटात अडकलेल्या व्यक्तीच्या अथवा प्राण्यांच्या मदतीला धावून येतात. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्यांना वाचवताना दिसत आहे.
हेही वाचा – ‘डिजिटल जप माळ’ पाहून थक्क झाले हर्ष गोएंका, म्हणाला, “हा आहे आपला देश!” पाहा Viral Video
मिचौंग वादळामुळे चेन्नईमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दरम्यान या व्हिडीओमध्ये एका व्हिडीओमध्ये दोन लोकांना रस्त्याच्या किनाऱ्यावर अडकलेल्या दोन कुत्र्यांना वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते आहे की, रस्त्यावर जवळपास कंबरेपर्यंत पाणी साचले आहे. त्यामध्ये एका कोपऱ्यात एक कुत्रे पाण्यात उभे आहे. तेवढ्यात एक व्यक्ती पाण्यामध्ये अकडलेल्या कुत्र्याला उचलून एका वाहनात ठेवतो. त्यानंतर आणखी एक कुत्रा तिथे येतो. त्यालाही उचलून वाहनात ठेवतो.
हेही वाचा – काश्मीरच्या विकासावर तरुणांनी गायले रॅप साँग; तुम्ही ऐकले का ‘बदलता काश्मीर’ गाणे? पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ पाहून लोकांनी त्यांचे कौतूक केले आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माणुसकी अजूनही जिवंत आहे. धन्यावद बचाव दल!” व्हिडीओ शेअर केल्यापासून १ लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे. २ हजार पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओवर पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहे. एकाने लिहिले की, तुम्हाला सलाम!