दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. हा प्रेमाचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो. कारण- या खास दिवसाचे निमित साधून तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीवर असणारं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. तर हा प्रेमाचा दिवस आणखीन खास करण्यासाठी गूगलनेही त्याचे हटके डूडल सादर केले आहे. गूगल तुम्हाला एखाद्या डेटिंग ॲपप्रमाणे तुमचा जोडीदार शोधण्याची संधी देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही गूगल ॲप ओपन करताच तुम्हाला रंगीबेरंगी गूगल डूडल दिसेल. निळ्या रंगाच्या दोन बाहुल्या एखाद्या जोडीदाराप्रमाणे एकमेकांशी कनेक्ट होतात. तसेच या बाहुल्यांच्या वर प्ले बटण आहे. तेथे क्लिक करताच तुम्हाला ‘केमिस्ट्री गेम’ दिसेल. गूगल डूडल खेळामार्फत तुम्हाला आजच्या दिवसाचे महत्त्व सांगेल आणि युजरचे मनोरंजनही करील. विशेष म्हणजे या खेळामार्फत तुम्हाला तुमचा जोडीदारही मिळू शकतो. पण ते कसे? तर यासाठी तुम्हाला एलिमेंट गेम खेळावा लागेल. त्यामध्ये तुम्ही एक एलिमेंट असणार आहात आणि तुम्हाला दुसऱ्या एलिमेंटशी तुमचे बॉण्ड तयार करायचे आहे.

हेही वाचा…विनाहेल्मेट प्रवास करताना पकडलं म्हणून तरुणाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे चावलं बोट; पाहा VIDEO

त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही गूगल ॲप ओपन करा. तिथे तुम्हाला गूगल डूडल दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर गेम खेळण्यासाठी प्ले बटणावर क्लिक करा. तिथे तुम्हाला क्विझ खेळासाठी पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांमध्ये तुम्हाला कसे घर खरेदी करायला आवडेल? तुम्ही कधी व्यायाम करता का? आदी प्रश्नांचा यात समावेश असेल. तुमच्या उत्तरांवर आधारित गूगल तुम्हाला तुमच्यासाठीचा योग्य पार्टनर शोधण्यासाठी मदत करील.

त्यानंतर तुम्हाला खाली स्टार्ट बॉण्डिंग असा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इतर एलिमेंटचे पर्याय दिले जातील. उदाहरणार्थ- एखाद्या डेटिंग ॲपमध्ये तुम्ही जोडीदार शोधता. हे अगदी तसेच असणार आहे. यादरम्यान तुम्हाला एखाद्या एलिमेंटबरोबर बॉण्ड करण्याची इच्छा असेल, तर त्यावर तुम्ही राईट स्वाईप करा. त्यानंतर लेट्स कम्बाइन या पर्यायावर क्लिक करा. मग तुमचे जोडीदाराबरोबर नवीन बॉण्ड तयार होईल. अशा प्रकारे गूगलने व्हॅलेंटाईन डेनिमित्त खास डूडल सादर केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google celebrate valentines day 2024 with doodle play chemistry quiz game to find your partner asp