Navroz 2023 पारसी नववर्ष निमित्त गूगलने खास डूडल साकारत आपल्या होमपेजच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. पारसी समाजातील परंपरांनुसार ‘नवरोज’ हा वसंत ऋतूतील पहिला दिवस असतो. त्यामुळे गूललनेही या अत्यंत आनंदाच्या आणि वेगळ्या दिवसानिमित्त जगभरातील पारसी समूहाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज निमित्त सादर करण्यात आलेल्या या डूडलध्ये यंदा वेगवेगळ्या फुलांच्या रंगांचा उत्सव दाखवला आहे. ज्यात अनेक रंगीबेरंगी फुले दिसत आहेत.ज्यामुळे पाहताक्षणीच लक्षात येते की वसंत ऋतू सुरु झाला आहे.
तीन हजार वर्षांहून अधिक जुना इतिहास –
जगभरातील पारशी समाजातील लोक त्यांचा नवरोझ हा खास सण साजरा करतात. ‘नवरोझ’ हा पर्शियन शब्द आहे, जो नव आणि गुलाब या दोन शब्दांनी बनलेला आहे. नव म्हणजे ‘नवीन’ आणि रोज म्हणजे ‘दिवस’, म्हणून ‘नवरोझ’ म्हणजे ‘नवीन दिवस’. नवरोझ साजरा करण्याचा इतिहास तीन हजार वर्षांहून अधिक जुना आहे. पारशी समाज या सणाला ‘पतेती’ किंवा ‘जमशेदी नवरोझ’ असेही म्हणतात.
हेही वाचा – विवाहित गर्लफ्रेंडसाठी पठ्ठ्याची थेट हायकोर्टात धाव; कोर्टानं ठोठावला पाच हजारांचा दंड
नवरोझच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करून घर फुलांनी सजवण्याची परंपरा आहे. अनेक घरांमध्ये चंदनाच्या लाकडानेही घर सुगंधित करण्यात येतं. नवरोझच्या दिवशी पारशी कुटुंबातील लहानथोर सर्वजण पहाटेपासूनच उत्सवाच्या तयारीला लागतात. या दिवशी घरांची स्वच्छता आणि सजावट केली जाते. पारशी मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात, ज्यात समाजातील सदस्य उपस्थित असतात. यानंतर एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. नवरोझच्या निमित्ताने घरोघरी पाहुण्यांच्या भेटीगाठी आणि त्यांना शुभेच्या देण्यात येतात.