भारतात सध्या गोमांसबंदीचा मुद्दा गाजत असतानाच गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुंदर पिचाई गोमांसबंदीसंदर्भात मतप्रदर्शन करताना दिसत आहे. ‘मला राजकारणात रस नाही, पण मला आता भारतातल्या लाखो बेरोजगारांची चिंता सतावत आहे. गोमांस खाणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर बंदी आणण्याचा कोणालाही अधिकार नाही’ अशा आशयाचे हे वक्तव्य आहे. सध्या भारतात गोमांसबंदीचा मुद्दा संवेदनशील झाल्याने साहजिकच या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते. त्यामुळे जागतिक परिस्थितीचे अचूक भान असणाऱ्या सुंदर पिचाई यांनी विनाकारण हा वाद ओढवून का घेतला, असा प्रश्नही अनेकांना पडला. मात्र, या सगळ्याची खातरजमा केल्यानंतर सुंदर पिचाईंच्या नावाने कुणीतरी हा फेक मेसेज व्हायरल करत असल्याचे स्पष्ट झाले. सुंदर पिचाईंच्या एका फोटोसह हा मेसेज व्हायरल होत होता. मात्र, बारकाईने पाहिल्यानंतर या फोटोमधील पिचाई यांच्या नावाची स्पेलिंगही चुकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कुणीतरी पिचाई यांच्या नावाने अपप्रचार करत असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, आता याप्रकरणी काय कारवाई करण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

sunder-pichai

Story img Loader