गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी आपल्या कॉलेजच्या जून्या आठवणींना उजाळा दिला. आयआयाटी खडगपूर येथे त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी कॉलेजच्या दिवसांतील काही किस्से मुलांना ऐकवले. आपल्याला हिंदी भाषा येत नव्हती. थोडी हिंदी समजायची पण बोलता मात्र यायची नाही त्यामुळे इथल्या मुलांनी शिव्या जरी दिल्या तरी कळायच्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. येथे विद्यार्थ्यी कधी कधी ‘अबे साले’ अशी हाक मारत तेव्हा ते शिवी देत आहेत हेच मला माहित नव्हते असाही मजेशीर किस्सा त्यांनी मुलांना सांगितला. एकमेकांना आदर देण्यासाठी ते ‘साले’ शब्द वापरत असतील असे मला वाटायचे मात्र ही शिवी असल्याचे मला खूप उशीरा कळले अशा अनेक किस्स्यांना त्यांनी यावेळी उजाळा दिली.

वाचा : विनयभंग करणाऱ्या तरुणाला बंगळुरूच्या मुलीने शिकवला धडा

सुंदर पिचई आपल्या पत्नीलाही खडगपूरच्या कॅम्पसमध्ये भेटले होते. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले त्याकाळी आताइतके प्रेम करणे सोपे नव्हते. त्याकाळी तर मुले मुली इतक्या सहजतेने एकमेकांशी बोलतही नव्हते त्यामुळे प्रेम, रोमान्स या सा-या गोष्टी बाजूलाच राहिल्या. आयआयटी खडगपुरमधला आणखी एक किस्सा त्यांनी मुलांना सांगितला. त्यावेळी आम्हीही मजा मस्ती करायचो, कधी कधी तर इतकी हद्द व्हायची की तुमच्या कुलूप लावलेल्या खोलीतील सामान कुलूप न उघडता कुठे भलतीकडेच गेलेले असायचे. पण यामागे कोण होते याचा पत्ता मात्र कोणालाच लागयचा नाही.
सुंदर पिचई यांनी आयआयटी खडगपूरमधूनच शिक्षण घेतले. २०१५ मध्ये ते गुगलचे सीईओ झाले. त्यांनी गुरूवारी आयआयटीमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

Story img Loader