सध्या सर्वत्र करोनाचा फटका बसत आहे. क्रीडाक्षेत्रातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या क्रिकेट आणि फुटबॉल खेळाच्या स्पर्धादेखील रद्द झाल्या आहेत. अशा वेळी विविध टीव्ही वाहिन्या आपल्या जुन्या चांगला आणि गाजलेल्या मालिका पुन:प्रक्षेपित करू लागल्या आहेत. रामायण आणि महाभारत या सारख्या मालिकांना दमदार प्रतिसाद मिळालेलाही दिसला आहे. त्यानंतर आता गुगलनेही आपले काही गाजलेले डुडल पुन्हा आणले आहेत. त्यात मंगळवारी गुगलने क्रिकेटच्या खेळाचे डुडल आणले.

दुर्दैवी! करोनामुळे मूळ भारतीय असलेल्या ज्येष्ठ क्रीडापटूचे निधन

२०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी हे डुडल बनवण्यात आले होते. इंग्लंडमध्ये या स्पर्धेला १ जूनपासून सुरूवात झाली होती. त्या निमित्त गुगल डुडलवर ICC Champions Trophy चा फिव्हर पाहायला मिळला होता. गुगलने नेहमीच्या क्रिएटिव्ह आणि मजेशीर पद्धतीने डुडल तयार केले होते. आपण आतापर्यंत व्हिडिओ गेम किंवा मोबाईलवर खेळलेल्या क्रिकेट गेम्सप्रमाणेच या डुडलचे स्वरूप होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“Ouch”… इशा गुहाने केलं माजी क्रिकेटपटूला ट्रोल

विराटवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही – डीव्हिलियर्स

आजही तेच गुगल डुडल गुगलच्या होमपेजवर दिसते आहे. गुगलच्या होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला बॅट आणि चेंडूच्या सहाय्याने डिझाईन केलेला गुगलचा लोगो दिसेल. या लोगोवरील स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर क्रिकेटच्या सामन्याला सुरूवात होते. मजेशीर गोष्ट म्हणजे या सामन्यात किटक आणि गोगलगाय हे प्रतिस्पर्धी संघ आहेत. तुम्ही या सामन्यात किटक संघाकडून फलंदाजी करू शकता. आजुबाजूला शेत असणाऱ्या हिरव्यागार मैदानावर हा सामना रंगलेला आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून जमलेल्या गोगलगायी आणि किडे डुडलची मजा आणखी वाढवतात. याशिवाय, या सामन्यात पंच असलेली गोगलगायसुद्धा जमिनीखालून अंपायरिंग करते. तुम्ही आऊट झाल्यानंतर ही गोगलगाय आऊटचा फलक घेऊन जमिनीखालून वर येते. महत्त्वाची गोष्ट आऊट झाल्यानंतरही तुम्ही रिफ्रेश बटनावर क्लिक करून वारंवार फलंदाजी करू शकता. एकूणच हे संपूर्ण डुडल तुम्हाला करोनाच्या ताणातून काहीसे ‘रिफ्रेश’ करणारे आहे. त्यामुळे तुम्हा एकदा तरी या खेळाचा आस्वाद घ्या.

Story img Loader